Champions Trophy 2025 : आयसीसीकडून यंदा जवळपास 8 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबई येथे हायब्रीड पद्धतीने खेळवली जातेय. तब्बल 29 वर्षांनी आयसीसी टूर्नामेंटचे आयोजन पाकिस्तानात करण्यात आले असून स्पर्धेपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जय्यत तयारी केली होती. मात्र शुक्रवारी अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यादरम्यान पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे मैदानात पाणी साचले आणि परिस्थिती पाहून सामना रद्द करण्यात आला. यावेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामुळे जगभरात पाकिस्तानचा हशा झाला आहे.
शुक्रवार 28 फेब्रुवारी लाहोरच्या मैदानात ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात ग्रुप स्टेजचा सामना पार पडला. या सामन्या दरम्यान पाऊस पडल्याने स्टेडियममध्ये पाणी साचले होते. मैदानातील ओलावा सुकवण्यासाठी मैदानाचा ग्राउंड स्टाफ सक्षम नव्हता. ग्राउंड स्टाफ कसा बसा मैदानातून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पाणी बाहेर काढत असताना ग्राउंड्समॅन मैदानात धाडकन घसरून पडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
हेही वाचा : पृथ्वी शॉ सपना गिल प्रकरणाला वेगळं वळण, FIR रद्द होणार नाही? हायकोर्टाने दिले निर्देश
स्टेडियमवरील खराब ड्रेनेज सिस्टम आणि स्टेडियमवरील सुविधांमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर टीका केली जात आहे. अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ग्रुप बीचा महत्वाचा सामना रद्द झाला. ज्याचा ऑस्ट्रेलियाला फायदा होऊन ते थेट सेमी फायनलसाठी क्वालिफाय झाले. तर अफगाणिस्तानच्या सेमी फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा मावळल्या. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करून ऑस्ट्रेलियाला 274 धावांचे लक्ष दिले होते. त्यासमोर ऑस्ट्रेलियाने 12.5 ओव्हरमध्ये 109 धावा केल्या. पावसाच्या अडथळ्यामुळे पुढे सामना होऊ शकला नाही. ज्यामुळे अंपायरनी सामना रद्द केला जात असल्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण मिळाला. ज्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये 4 गुण झाल्याने ऑस्ट्रेलिया ग्रुप बी मधून सेमी फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला.
AFGvAUS AUSvsAFG pic.twitter.com/YuKOyxT2Ze
— AA (photuuu99) February 28, 2025
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सेमीफायनलचा पहिला राउंड हा 4 फेब्रुवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. 4 फेब्रुवारी रोजी पहिला सेमी फायनल सामना दुबईत पार पडेल. तर 5 फेब्रुवारी रोजी दुसरा सेमी फायनल सामना हा पाकिस्तानात खेळवला जाईल. याशिवाय 9 मार्च रोजी फायनल सामना खेळवला जाणार आहे. जर टीम इंडियाने सेमी फायनल जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला तर चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल सामना हा दुबईत पार पडेल.