Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

आमचा अपमान झाला म्हणणाऱ्या पाकिस्तानला ICC नं फटकारलं! 'चॅम्पियन्स ट्रॉफी देताना तुमचे अधिकारी...'

Champion Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर पुरस्कार सोहळ्यावरुन वाद निर्माण झाला होता. भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी देताना त्या समारंभात यजमान असलेलय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा (PCB) एकही अधिकारी मंचावर उपस्थित नव्हता. आता या संपूर्ण प्रकरणावर आयसीसीने स्पष्टीकरण दिले आहे.  

आमचा अपमान झाला म्हणणाऱ्या पाकिस्तानला ICC नं फटकारलं! 'चॅम्पियन्स ट्रॉफी देताना तुमचे अधिकारी...'

ICC Champions Trophy 2025 Final Award Ceremony: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही स्पर्धा चांगलीच रंगली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडशी (ind vs nz)  भिडला. भारतीय संघाने न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव केला. भारतीय संघाने तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकून विक्रम केला आहे. सर्वप्रथम, भारतीय संघाने 2002 मध्ये श्रीलंकेसोबत हे विजेतेपद शेअर केले होते. त्यानंतर 2013 साली एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चॅम्पियन बनला. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा मोठा इतिहास रचला आहे. दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच PCB हे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे अधिकृत यजमान होते. पण आश्चर्याची बाब म्हणजे सामना संपल्यानंतरच्या सोहळ्यात पाकिस्तानचा एकही अधिकारी पुरस्कार सोहळ्याला उपस्थित नव्हता, त्यामुळे आता गोंधळ होत आहे. यावर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि वसीम अक्रम यांनीही टिपण्णी केली आहे. आता या वादावर आयसीसीचे स्पष्टीकरण आहे. 

झालेल्या वादावर आयसीसीचे स्पष्टीकरण

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर झालेल्या पुरस्कार सोहळ्यादरम्यान  पाकिस्तानचा एकही अधिकारी  उपस्थित नसल्यामुळे वाद निर्माण झाला होता. सोहळ्याच्यावेळी मंचावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा (PCB) एकही अधिकारी उपस्थित नव्हता. या स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे होते. त्यांच्या यजमानपदाखाली आयोजित करण्यात आली होती. आता घडलेल्या घटनेवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. आयसीसीने यजमान पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

हे ही वाचा: Trending Quiz: भारताची ती खास नदी, जिच्या पाण्यात वाहते सोने!

 

आयसीसीच्या प्रवक्त्याने काय सांगितले? 

आयसीसीच्या प्रवक्त्याने सांगितले की, "पीसीबी प्रमुख मोहसिन नकवी अनुपलब्ध होते आणि त्यांनी दुबईची यात्रा केली नाही. माझ्या मते प्रेझेंटेशन सोहळ्यासाठी बोर्डाच्या अधिकाऱ्यांनाच बोलावले जाऊ शकते. यासाठी पीसीबीचा कोणताही अधिकारी उपलब्ध नव्हता. ते (PCB) यजमान होते, त्यांनी तिथे असायला हवे होते." 

हे ही वाचा: कोण आहे ही महिला जिच्या पायावर नतमस्तक झाला विराट कोहली? चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर हा Video होतोय Viral

 

माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने त्याच्या X खात्यावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता आणि म्हटले होते की, 'भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, परंतु फायनलनंतर पीसीबीचा कोणताही प्रतिनिधी तेथे नव्हता. पाकिस्तान यजमान होता. पीसीबीचे कोणीही तेथे का नव्हते हे मला समजले नाही." याशिवाय वसीम अक्रमने टेन स्पोर्ट्सवर बोलताना संतापलेला दिसला. 

सविस्तर वाचा: Champions Trophy 2025: भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी देताना पाकिस्तानचा अपमान? शोएब अख्तर, वसीम अक्रमचा संताप

 

'असा' रंगला अंतिम सामना

फायनलबद्दल बोलायचे झाले तर न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम खेळताना न्यूझीलंड संघाने 251 धावा केल्या होत्या, जे भारताने 6 गडी गमावून पूर्ण केले. भारताकडून रोहित शर्माने 76 धावांची शानदार खेळी केली. हिटमॅन रोहितला त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी सामनावीराचा किताब देण्यात आला.

Read More