Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, सेमीफायनल जिंकण्यासाठी रोहितने 'या' खेळाडूंना दिली प्लेईंग 11 मध्ये संधी

Champions Trophy 2025 : दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून यापूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये टॉस पार पडला असून हा टॉस ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. 

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, सेमीफायनल जिंकण्यासाठी रोहितने 'या' खेळाडूंना दिली प्लेईंग 11 मध्ये संधी

Champions Trophy 2025 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला सेमी फायनल सामना खेळवला जात आहे.टीम इंडियाने ग्रुप स्टेजमधील तिनही सामने जिंकून पॉईंट टेबलमध्ये प्रथम स्थान मिळवत सेमी फायनलमध्ये एंट्री घेतली. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून यापूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये टॉस पार पडला असून हा टॉस ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. 

दुबईच्या स्टेडियमवर 4 मार्च रोजी भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमी फायनल सामन्याला दुपारी 2: 30 वाजता सुरु होणार असून या सामन्याचा टॉस हा अर्धातास आधी झाला. भारताचा कर्णधार आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांच्यात झालेला टॉस हा ऑस्ट्रेलियाने जिंकला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला असून भारताला गोलंदाजीची आव्हान दिले आहे. 

बरं झालं टॉस हरलो - रोहित : 

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने वनडे फॉरमॅटमध्ये सलग 11 व्या सामन्यात टॉस हरला. टॉस जिंकल्यावर ऑस्ट्रेलियाने फलंदाजी निवडली यावेळी रोहित म्हणाला, 'मी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही करायला तयार होतो. जेव्हा तुम्ही द्विधा मनस्थितीत असता तेव्हा टॉस हरणं चांगलं. खेळपट्टीचे स्वरूप बदलत राहते. तुम्हाला चांगले क्रिकेट खेळावे लागेल. आम्ही तिन्ही सामन्यांमध्ये चांगले क्रिकेट खेळलो आहोत आणि आम्ही तेच करण्याचा प्रयत्न करू. हे आव्हानात्मक असणार आहे. आम्ही एकाच संघासोबत खेळत आहोत या सामन्यासाठी प्लेईंग ११ मध्ये कोणताही बदल नाही. आम्हाला जिथे खेळायला सुरुवात केली होती तिथून पुढे जायचे आहे. आता आम्ही प्रथम गोलंदाजी करत आहोत, आम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि त्यांना शक्य तितक्या कमी धावांमध्ये मर्यादित ठेवावे लागेल'.

कसा आहे भारत - ऑस्ट्रेलियाचा हेड टू हेड रेकॉर्ड?

भारत - ऑस्ट्रेलिया हे दोन संघ आतापर्यंत वनडे फॉरमॅटमध्ये एकूण 151 वेळा आमने सामने आले आहेत. यापैकी 84 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केलाय तर 57 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवला आहे. तर यापैकी 10 सामने हे अनिर्णित राहिलेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलियात तीन सामने झाले, यापैकी दोन सामन्यात भारताचा तर एका सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय झाला. 

भारताची प्लेईंग 11 :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती

ऑस्ट्रेलियाची प्लेईंग 11 :

कूपर कॉनोली, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकिपर), अ‍ॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अ‍ॅडम झांपा, तनवीर संघा

Read More