Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

धर्माऐवजी शमीचं देशाला प्राधान्य; 'ही खरी देशभक्ती' म्हणत 'हा' फोटो जगभरात चर्चेत, कारण...

Champions Trophy 2025 Semi Final Mohammed Shami Viral Photo: हा फोटो सामाना सुरु झाल्यापासून सोशल मीडियावर चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

धर्माऐवजी शमीचं देशाला प्राधान्य; 'ही खरी देशभक्ती' म्हणत 'हा' फोटो जगभरात चर्चेत, कारण...

Champions Trophy 2025 Semi Final Mohammed Shami Viral Photo: दुबई अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये मंगळवारी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने चार गडी राखून विजय मिळवला. या विजयासहीत भारताचा फायनलमधील प्रवेश निश्चित झाला आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय फारसा फायद्याचा ठरला नाही. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सामन्यातील तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर ऑस्ट्रेलियन सलामीवर कूपर कोनोलीला भोपळाही न फोडता तंबूत परत पाठवलं. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 264 धावांवर रोखलं आणि उर्वरित काम भारतीय फलंदाजांनी केलं.

शमीची खणखणीत कामगिरी

भारताकडून मोहम्मद शमीने 3 विकेट्स घेतल्या. तर वरुण चक्रवर्ती, रविंद्र जडेजा या दोघांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्याप्रमाणे अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्याला प्रत्येकी एक विकेट मिळाली. भारतीय गोलंदाजांपैकी केवळ कुलदीप यादवला विकेट मिळाली नाही. तसेच भारतीय गोलंदाजांपैकी केवळ मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्तीने आपला पूर्ण स्पेल म्हणजे 10 ओव्हर गोलंदाजी केली. मात्र सध्या सोशल मीडियावर मोहम्मद शामीचं विशेष कौतुक होताना दिसत आहे. हे कौतुक करताना मोहम्मद शमीने देशाला प्रथम प्राधान्य दिल्याचं म्हणत चाहत्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

शमीचं ऐवढं कौतुक होण्याचं कारण काय?

ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथबरोबरच कूपर कोनोली, नेथन एलिस या दोघांना बाद करणारा शमी या व्हायरल फोटोमध्ये बॉण्ड्रीजवळ उभा राहून एनर्जी ड्रिंक पिताना दिसत आहे. आता तुम्ही विचार कराल की अशाप्रकारे खेळाडूंनी एनर्जी ड्रिंक पिणं ही सामान्य बाब आहे. त्यात एवढं कौतुक करण्यासारखं काय आहे? तर यामागील खास गोष्ट ही आहे की शमी हा इस्लाम धर्माचं पालन करतो. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. या महिन्यामध्ये मुस्लिम धर्मीयांचे रोझे म्हणजेच धार्मिक उपवास असतात. या कालावधीत सूर्योदय ते सूर्यास्तादरम्यान कोणतीही गोष्ट खाल्ली अथवा प्यायली जात नाही.

अनेकांनी व्हायरल केला 'तो' फोटो

मात्र शमीने धार्मिक आस्थेआधी देशासाठी खेळण्याला प्राधान्य दिलं. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत करण्यासाठी आपला सर्वोत्तम खेळ करावा लागणार याची शमीला जाणीव होती. त्यामुळेच त्याने सामन्याच्या दिवशी उपवास ठेवला नाही आणि तो पूर्ण ताकदीने देशाला जिंकून देण्यासाठी गोलंदाजी करत होता. शमीच्या या निर्णयाचं चाहत्यांनी कौतुक केलं आहे. अनेकांनी त्याचा हा एनर्जी ड्रिंक पितानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. 'धार्मिक मान्यतेपेक्षा राष्ट्रीय कर्तव्याला अधिक महत्त्व दिल्याबद्दल शमीचं कौतुक आहे,' असं अनेकांनी म्हटलं आहे. तुम्हीच पाहा या व्हायरल पोस्ट....

1)

2)

शमी बराच काळ मुख्य संघातून बाहेर होता. मात्र या स्पर्धेसाठी संघ निवडताना त्याला संधी देण्यात आली असून त्याने संधीचं सोनं केलं आहे असं म्हणता येईल. भारताच्या मुख्य गोलंदाजांपैकी एक असलेल्या शमीच्याच खांद्यावर या मालिकेत गोलंदाजीची धुरा आहे. जसप्रीत बुमराह जायबंदी झाल्याने शमी हा भारताचा हुकुमी एक्का ठरत आहे.

Read More