Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

रवींद्र जडेजाने लाबुशेनला रन घेण्यापासून रोखलं, ICC चा नियम मोडला, टीम इंडियाला मिळणार शिक्षा?

IND VS AUS Semi Final : टीम इंडियाकडून गोलंदाजी करणाऱ्या रवींद्र जडेजाने  त्याने टाकलेल्या बॉलवर धाव घेण्यापासून ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेनला रोखले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

रवींद्र जडेजाने लाबुशेनला रन घेण्यापासून रोखलं, ICC चा नियम मोडला, टीम इंडियाला मिळणार शिक्षा?

IND VS AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा सेमी फायनल सामना मंगळवार 4 मार्च रोजी पार पडला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 4 विकेट्सने विजय मिळवून फायनलमध्ये एंट्री घेतली. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलमध्ये पोहोचणारा भारत पहिला संघ ठरला. मात्र भारत - ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान असं काही घडलं ज्यामुळे सर्वच आश्चर्यचकित झाले. टीम इंडियाकडून (Team India) गोलंदाजी करणाऱ्या रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) त्याने टाकलेल्या बॉलवर धाव घेण्यापासून ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेनला (Marnus Labuschagne)रोखले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत - ऑस्ट्रेलिया संघात झालेला टॉस ऑस्ट्रेलियाने जिंकला आणि ते प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आले. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रेव्हिस हेड आणि कूपर कॉनोली यांनी स्वस्तात विकेट गमावली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन या दोघांनी काहीकाळ मैदानात टिकून फलंदाजी केली आणि अर्धशतकीय पार्टनरशिप करून ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 100 पार पोहोचवला. यावेळी भारताचा गोलंदाज रवींद्र जडेजा याला 21 वी ओव्हर टाकण्याची जबाबदारी मिळाली. 

हेही वाचा : हातावरचं बँडेज काढ...; Live सामन्यात अंपायरने रवींद्र जडेजावर घेतला आक्षेप

जडेजाने लाबुशेनला रोखलं : 

रवींद्र जडेजाने 21 व्या ओव्हरला टाकलेल्या पहिल्या बॉलवर ऑस्ट्रेलियाला धाव घेण्याची संधी मिळाली. यावेळी ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर स्मिथने जडेजाच्या बॉलवर ऑन ड्राइव खेळला, तेव्हा जडेजा त्याच्या उजव्या बाजूला जाऊन बॉल रोखण्याचा प्रयत्न करत होता मात्र बॉल त्याच्या पायाला लागून शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने जाऊ लागला. तेव्हा स्मिथ आणि लाबुशेन धाव घेण्याचा प्रयत्न करत होते. स्मिथ यावेळी त्याच्या क्रीजमधून एक ते दोन पावलं बाहेर पडला होताच पण तितक्यात जडेजा आणि लाबुशेनची टक्कर झाली. तेव्हा जडेजाने लाबुशेनला दोन्ही हाताने घट्ट पकडले आणि त्याला धाव घेण्यापासून रोखले. 

तेवढ्यात फिल्डरमी येऊन बॉल पकडला आणि ऑस्ट्रेलियाच्या हातून एक धाव घेण्याची संधी हुकली. सदर घटनेनंतर जडेजा हसू लागला पण ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ मात्र या घटनेने रागवला होता आणि त्याने जडेजाने केलेल्या कृतीबद्दल अंपायरकडे आक्षेप वर्तवला. परंतु अंपायरने जडेजावर कोणतीही कारवाई केली नाही. यानंतर जडेजाने टाकलेल्या चार बॉलवर ऑस्ट्रेलियाला एकही धाव घेता आली नाही.    यामुळे स्मिथचे लक्ष विचलित झाले आणि पुढच्या ओव्हरमध्ये त्याने 4 डॉट बॉल खाल्ले, ज्यामुळे स्मिथला 10 चेंडूत एकही धाव मिळाली नाही. त्यानंतर त्याच्या पुढच्याच ओव्हरला जडेजाने लाबुशेनची विकेट घेतली.

पाहा व्हिडीओ : 

टीम इंडियाला मिळणार शिक्षा?

जडेजाने केलेली कृती ही आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे, त्यामुळे टीम इंडियाला शिक्षा मिळणार का अशी चर्चा सुद्धा सुरु झालीये. आयसीसीचे नियम सांगतात जर कोणी गोलंदाज फलंदाजाला धाव घेण्यापासून रोखतो तर त्याला खेळात बाधा निर्माण केल्या प्रकरणात दोषी मानेल जाते. यामुळे फिल्डिंग करणाऱ्या संघावर 5 धावांची पेनल्टी लागते. म्हणजे नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या स्कोअरमध्ये 5 अतिरिक्त धावा जोडल्या जातात. सोबतच गोलंदाजाने टाकलेल्या त्या बॉलला रद्द करून त्याला अजून एक अतिरिक्त बॉल टाकण्यास सांगितला जातो. परंतु जडेजाच्या या कृतीवर स्टीव्ह स्मिथने आक्षेप घेऊन सुद्धा अंपायरने त्याला गंभीर उल्लंघन मानले नाही. त्यामुळे टीम इंडिया 5 धावांच्या पेनल्टी पासून वाचली. 

Read More