Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

कॅप्टन रोहित शर्माची एक चूक टीम इंडियाला महागात पडली, अक्षर पटेलची हात जोडून मागितली माफी

Champions Trophy 2025 :  गोलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाने बांगलादेशचा निम्मा संघ 9 व्या ओव्हरलाच तंबुत धाडला. दरम्यान मोहम्मद शमी आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

कॅप्टन रोहित शर्माची एक चूक टीम इंडियाला महागात पडली, अक्षर पटेलची हात जोडून मागितली माफी

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या रणसंग्रामाला सुरुवात झाली असून गुरुवारी भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात सामना खेळवला जात आहे. या सामन्याचा टॉस बांगलादेशने जिंकून त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु गोलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाने बांगलादेशचा निम्मा संघ 9 व्या ओव्हरलाच तंबुत धाडला. दरम्यान मोहम्मद शमी आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. दरम्यान रोहित शर्माच्या एका चुकीमुळे अक्षर पटेलची हॅट्रिक चुकली, ज्यामुळे भर मैदानात रोहित अक्षरची माफी मागताना दिसला. 

नेमक काय घडलं? 

बांगलादेश विरुद्ध मैदानात उतरताच टीम इंडियाच्या गोलंदाजांनी एकामागोमाग एक बांगलादेशी फलंदाजांना तंबूत धाडण्यास सुरुवात केली. पहिल्याच ओव्हरला मोहम्मद शमीने सौम्या सरकारची विकेट घेतली तर दुसऱ्या ओव्हरला बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो बाद झाला. हर्षित राणाने त्याची विकेट घेतली. तर सहाव्या ओव्हरला पुन्हा बांगलादेशचा फलंदाज मेहदी हसन मिराज याची विकेट घेण्यात शमीला यश आले. रोहित शर्माने 9 वी ओव्हर टाकण्यासाठी अक्षर पटेलला बॉलिंग दिली. यावेळी ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर अक्षर पटेलने तनजीद हसनची विकेट घेतली. तर पुढच्याच बॉलवर मुशफिकर रहीम याला सुद्धा बाद केले. ओव्हरच्या चौथ्या बॉलवर गोलंदाज अक्षर पटेलला हॅट्रिक विकेट घेण्याची संधी होती मात्र कर्णधार रोहित शर्माकडून कॅच मिस झाल्यामुळे अक्षरने विकेट गमावली. यानंतर रोहित शर्माने भर मैदानात अक्षरची हात जोडून माफी मागितली. बांगलादेशचा स्कोअर यावेळी 35 धावांवर 5 विकेट्स असा होता. 

पाहा व्हिडीओ : 

कुठे पाहाल चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे सामने?

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेचे सामने प्रेक्षकांना टीव्ही तसेच डिजिटल गॅजेट्सवर पाहता येतील. टीव्हीवर हे सामानाने स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेलवर दाखवले जातील. तर JioHotstar च्या अँप तसेच वेब साईटवर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पारपडेल. 

भारताची प्लेईंग 11 :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव

बांगलादेशची प्लेईंग 11 :

तन्झिद हसन, सौम्या सरकार, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकिपर), मेहदी हसन मिराझ, जाकेर अली, रिशाद हुसेन, तन्झिम हसन साकिब, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान

Read More