Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Champions Trophy 2025: 'दुबईच्या पिचवर भारतालाच...', फायनलआधी न्यूझीलंड संघाच्या कर्णधाराचं मोठं विधान

Champions Trophy 2025 Final: भारत आणि न्यूझीलंडमध्ये 9 मार्चला चॅम्पिअन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. दरम्यान या सामन्याआधी न्यूझीलंड संघाचा कर्णधार मिचेल सेंटरनने एक विधान केलं आहे. भारताला दुबईच्या खेळपट्टीबाबत जास्त कल्पना आहे असं त्याने म्हटलं आहे.   

Champions Trophy 2025: 'दुबईच्या पिचवर भारतालाच...', फायनलआधी न्यूझीलंड संघाच्या कर्णधाराचं मोठं विधान

 Champions Trophy 2025 Final: चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवण्यात आली आहे. भारतीय संघाने सुरक्षेच्या कारणास्तव आणि केंद्र सरकारने नकार दिल्याने पाकिस्तानचा दौरा केला नाही. यामुळे भारताचे सर्व सामने दुबईत खेळवण्यात आले. त्यातच आता भारतीय संघ फायलनमध्ये पोहोचला असल्याने हा सामना दुबईत खेळला जाणार आहे. दरम्यान भारतीय संघाला फक्त एकाच ठिकाणी खेळायचं असल्याने, फायदा झाल्याचा एक टीकात्मक सूर सध्या उठला आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या अनेक खेळाडूंनी यावर भाष्य केलं आहे. यावर रोहित शर्माने भारतीय संघ दुबईत खेळत आहे, जे त्यांच्या घरचं मैदान नाही असं म्हटलं होतं. त्यातच आता चॅम्पिअन्स ट्रॉफी फायनलआधी न्यूझीलंडच्या कर्णधारानेही दुबई्च्या खेळपट्टीवर भाष्य केलं आहे. 

न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सेंटनरने दुबईमधील धीम्या गतीची खेळपट्टी भारतासाठी ओळखीची आहे असं म्हटलं आहे. तसंच आपला संघ चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात संघर्ष करण्यासाठी तयार आहे असंही त्याने म्हटलं आहे. 9 मार्चला भारताविरोधात होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंड संघ गुरुवारी संध्याकाळी दुबईत दाखल झाला. 

सेंटरनरने म्हटलं की, "त्यांनी (भारताने) आपले सर्व सामने दुबईत खेळले आहेत आणि त्यांना खेळपट्टी चांगली माहिती आहे. नक्कीच खेळपट्टी आम्ही कशा प्रकारे खेळू इच्छितो हे ठरवणार आहे. लाहोरमधील खेळपट्टीच्या तुलनेत ही धीमी असू शकते. पण आम्ही संघर्षासाठी तयार आहोत".

सेंटनरने न्यूझीलंड संघ ग्रुप राऊंडमध्ये भारताविरोधात खेळलेल्या सामन्यातील काही अनुभवावर अभ्यास करु शकतो असं सांगितलं आहे. भारताने ग्रुप सामन्यात न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला होता. त्याने सांगितलं की, "आम्ही एका चांगल्या संघाविरोधात खेळत आहोत. मला वाटतं आम्ही मागील काळात त्यांच्याविरोधात जी चांगली कामगिरी केली होती, त्यापेक्षा उत्तम कामगिरी करु. आम्ही थोडी चांगली कामगिरी केली आहे. ती कामगिरी सुरु राहील अशी आशा आहे".

हायब्रीड मॉडेलमुळे कराव्या लागणाऱ्या पाकिस्तान-दुबई प्रवासावर सेंटनरने, गेल्या काही दिवसांत आम्ही व्यग्र वेळापत्रकासह तालमेल बसवला आहे. "हा स्पर्धेचा अनुभव आहे, जिथे तुम्हाला थोडी  हालचाल करावी लागते. हे सर्व आव्हानात्मक आहे. मला वाटतं की, खेळाडूंना हा सगळा खेळाचा भाग आहे याची कल्पना असते. जोपर्यंत तुम्ही खेळासाठी तयार असता तोपर्यंत सर्व काही ठीक असतं",

Read More