CSK Retaintion List For IPL 2025: इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2025) 18 वा सीजन आता काही महिन्यांतच सुरु होणार असून यासाठी मेगा ऑक्शन नोव्हेंबर महिन्यात पार पडणार आहे. या ऑक्शनपूर्वी आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या नियमांनुसार प्रत्येक फ्रेंचायझीला त्यांचे रिटेन केलेले 6 खेळाडू 31 ऑक्टोबर पर्यंत जाहीर करायचे होते. त्यानुसार चेन्नई सुपरकिंग्सने (Chennai Superkings) गुरुवारी त्यांच्या 5 खेळाडूंची रिटेन्शन लिस्ट जाहीर केली.
Superfans, here39s your Diwali Parisu
— Chennai Super Kings (ChennaiIPL) October 31, 2024
An anirudhofficial Musical ft. IPL Retentions 2025
UngalAnbuden WhistlePodu pic.twitter.com/FGTXm52v74
चेन्नई सुपरकिंग्सने जाहीर केलेल्या 5 रिटेन खेळाडूंमध्ये 4 भारतीय तर एका विदेशी खेळाडूचा समावेश आहे. सीएसके फ्रेंचायझीने त्यांच्या 5 खेळाडूंच्या रिटेन्शन लिस्टमध्ये प्रथम क्रमांकावर कर्णधार ऋतुराज गायकवाड, दुसऱ्या क्रमांकावर रवींद्र जडेजा, तिसऱ्या क्रमांकावर शिवम दुबे, चौथ्या क्रमांकावर माथीशा पथिराना तर पाचव्या क्रमांकावर अनकॅप्ड खेळाडू म्हणून एम एस धोनीला रिटेन करण्यात आले आहे.
आयपीएल 2024 पूर्वी एम एस धोनीने चेन्नई सुपरकिंग्सचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवलं होतं. यंदाही ऋतुराज गायकवाडचं सीएसकेचा कर्णधार असेल. त्यामुळे चेन्नई फ्रेंचायझीने ऋतुराज गायकवाड याला 18 कोटी रूपयांना रिटेन केलं आहे. तर श्रीलंकेचा गोलंदाज मथीशा पथिराणाला 13 कोटी, शिवम दुबेला 12 कोटी, रवींद्र जडेजाला 18 कोटी, महेंद्रसिंह धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून 4 कोटींना रिटेन केलं आहे. 6 पैकी 5 खेळाडूंना रिटेन करून मुंचेन्नई सुपरकिंग्सने एक RTM कार्ड राखून ठेवलं आहे. सध्या चेन्नईच्या पर्समध्ये 65 कोटी रुपये शिल्लक असून ते हे पैसे ऑस्कनमध्ये संघाची पुनर्रबांधणीसाठी करण्यासाठी खर्च करतील.