Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखच्या हातातील 'तो' फोटो कोणाचा?

जॉर्जियाच्या बटुमीमध्ये चेस वर्ल्ड कप जिंकणाऱ्या 19 व्या वर्षीय दिव्या देशमुखचं नापुरात जंगी स्वागत करण्यात आलं. 

वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखच्या हातातील 'तो' फोटो कोणाचा?

जॉर्जियाच्या बटुमीमध्ये चेस वर्ल्ड कप जिंकणाऱ्या 19 व्या वर्षीय दिव्या देशमुखचं नापुरात जंगी स्वागत करण्यात आलं. नागपूर विमानतळापासूनच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता. दिव्याने या टूर्नामेंटमध्ये भारतच्या अनुभवी खेळाडू कोनरु हम्पीला टाय ब्रेकरमध्ये हरवून हा किताब आपल्या नावे केला. दोन्ही खेळाडूंमध्ये दो क्लासिकल गेम ड्रॉ झाले. ज्यानंतर टाय ब्रेकरने दिव्याने विजय मिळवला. 

या विजयामुळे दिव्याला ग्रँडमास्टर (जीएम) ही पदवी मिळाली, तसेच कॅंडिडेट्स स्पर्धेत स्थान आणि ५०,००० अमेरिकन डॉलर्स (अंदाजे ४२ लाख रुपये) बक्षीस रक्कम मिळाली. दिव्याने स्पर्धेत अंडरडॉग म्हणून प्रवेश केला आणि तिचे ध्येय फक्त जीएम-नॉर्म साध्य करणे होते, परंतु तिने जेतेपद जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले.

दिव्या तिच्या आईसोबत नागपूर विमानतळावर पोहोचली. दिव्या तिच्या आईसोबत बटुमीहून मुंबईमार्गे नागपूरला पोहोचली. यावेळी तिच्या हातातील फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधलं. हा फोटो नक्की कुणाचा? दिव्या देशमुखच्या आयुष्यात यांचं काय महत्त्व आहे? 

दिव्याच्या हातातील फोटोने लक्ष वेधले 

दिव्या देशमुखने आपल्या यशाचं श्रेय कुटुंबाला आणि तिचे पहिले कोच राहुल जोशी यांना दिले. राहुल जोशी यांचे 2020 मध्ये 40 व्या वर्षी निधन झाले. माझ्या या यशामध्ये माझे सर्वात पहिले कोच राहुल जोशी यांचा सर्वात मोठा वाटा आहे. राहुल सरांना कायमच वाटायचं की, मी ग्रँड मास्टर बनू. त्यामुळे माझा हा विजय त्यांना अर्पण आहे. 

दिव्याने ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांना देखील आपल्या यशाचं श्रेय दिलं आहे. अभिजीत सर माझ्यासाठी लकी चार्म असल्याचं तिने सांगितलं. ते जेव्हा जेव्हा माझ्यासोबत असतात तेव्हा मी ट्रॉफी जिंकतेच. स्वागताबद्दल आनंद व्यक्त करताना दिव्या म्हणाली की, माझे स्वागत करण्यासाठी इतके लोक आले आहेत याचा मला खूप आनंद आहे. बुद्धिबळाला इतका आदर मिळत आहे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

ग्रँड स्विस स्पर्धेत होणार सहभागी 

विश्वचषक विजयानंतर, दिव्याला आता थोडी विश्रांती घ्यायची आहे. त्यानंतर, ती २ ते १६ सप्टेंबर दरम्यान उझबेकिस्तानमधील समरकंद येथे होणाऱ्या ग्रँड स्विस स्पर्धेत भाग घेईल. तिने सांगितले की या महिन्यात मी थोडी विश्रांती घेईन आणि पुढच्या महिन्यात ग्रँड स्विसमध्ये खेळेन. "दिव्याच्या या कामगिरीने केवळ नागपूरलाच नव्हे तर संपूर्ण देशाला अभिमानाने भरून टाकले आहे. तिच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे ती बुद्धिबळाच्या जगात एक नवीन स्टार बनली आहे.

Read More