Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

पुजाराची वादळी खेळी! काउंटीमध्ये झळकवलं सलग तिसरं शतक

पुजारा फुल्ल फॉर्ममध्ये पण टीम इंडियात पुन्हा संधी मिळणार? तुम्हाला काय वाटतं एक संधी द्यावी का?

पुजाराची वादळी खेळी! काउंटीमध्ये झळकवलं सलग तिसरं शतक

मुंबई : भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आपल्या खराब फॉर्ममुळे चर्चेत आला. चेतेश्वर पुजारा आता पुन्हा चांगल्या फॉर्ममध्ये खेळताना दिसत आहे. काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पुजाराची बॅट तुफान चालली आहे. त्याने 3 शतक ठोकले. पुजारा पुन्हा फॉर्ममध्ये खेळताना पाहून सर्वांनाच आनंद झाला आहे. 

अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये तिसरं शतक ठोकलं आहे. आयपीएलपासून दूर राहिलेल्या पुजाराला आता काउंटीमध्ये चांगलं यश मिळालं आहे. टीम इंडियामध्ये त्याच्या बॅटमधून जिथे एकही धाव निघत नव्हती आता काउंटीमध्ये थेट शतक ठोकलं आहे. 
पुजाराने 16 चौकार ठोकले आहेत. पुजाराचा हा फुल्ल फॉर्म पाहता टीम इंडियामध्ये त्याची पुन्हा एन्ट्री होणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

ससेक्स टीमने विरुद्ध टीमवर 139 धावांची आघाडी मिळवली आहे. काउंटीमध्ये पुजाराने 5 डावांमध्ये तिसरं शतक ठोकलं आहे. पुजारा पुन्हा चांगली कामगिरी करत असल्यानं त्याचं कौतुक होत आहे. 

टीममध्ये पुन्हा पुजाराला देणार संधी?

दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर टीम इंडियातून बाहेर असलेला पुजारा या शानदार लयीत इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठी टीममध्ये परतणार का? निवड समिती संधी देणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Read More