Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

क्रिस गेलवर चढला भगवा रंग, फॅन्सनी म्हटले कृष्णा गोयल

आयपीएलच्या ११व्या हंगामात आपल्या फलंदाजीने क्रिस गेलने सर्वांनाच हैराण केलेय. तो पहिल्यांदा पंजाब संघाकडून खेळतोय. 

क्रिस गेलवर चढला भगवा रंग, फॅन्सनी म्हटले कृष्णा गोयल

मुंबई : आयपीएलच्या ११व्या हंगामात आपल्या फलंदाजीने क्रिस गेलने सर्वांनाच हैराण केलेय. तो पहिल्यांदा पंजाब संघाकडून खेळतोय. आयपीएलच्या लिलावात अखेरच्या क्षणी प्रीती झिंटाने त्याला बेस प्राईजवर खरेदी केले. प्रीतीचा हा निर्णय गेलने खरा करुन दाखवला. सध्या गेल पंजाबचा महत्त्वाचा खेळाडू बनलाय. गेलचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

गेलने आपल्या इन्टाग्रामवरुन देसी लूक असलेला फोटो शेअर केलाय. यात गेल कुर्ता पायजमा घातलेला दिसतोय. गेलने भगव्या रंगाचा कुर्ता घातलाय. त्याच्यावर हा कुर्ता शोभून दिसतोय. त्याचा हा देसी लूक पाहून भारतीय फॅन्स चांगलेच खुश झालेत. त्याने जसा हा फोटो पोस्ट केला तर त्यावर लगेचच भारतीय चाहत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. 

 

 

A post shared by KingGayle (@chrisgayle333) on

काहींनी तर गेलने भारतीय नागरिकत्व घ्यावी असं म्हटलंय. तर काहींनी त्याच्या लुकवर मजेदार कमेंटही केल्यात.  एका युझरने तर गेलला कृष्णा गोयल असे नाव दिलेय. काहींनी त्याला भारतात आधारकार्ड बनवण्यास सांगितले. गेल सध्या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने आतापर्यंत जितके सामने खेळलेत त्या सर्व सामन्यांत त्याने ५०हून अधिक धावा केल्यात. गेलने ३ सामन्यांत २२९ धावा केल्या. यात एका शतकाचाही समावेश आहे. 

fallbacks

याआधी गेल सनी लिओनीच्या एका गाण्यावर डान्स करताना त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता गेलचा भगवा लूक लोकांना चांगलाच भावतोय.

Read More