Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

हारकर जीतने वाले को बाजीगर कहते है! ऋषभ पंतसारखा तुटलेला हात गळ्यात घेऊन गेला बॅटिंगला; भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याचा हिरो

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू क्रिस वोक्सची बराबरी ऋषभ पंतशी होत आहे. ऋषभ पंतसारखी हाताला दुखापत झाली असताना क्रिस वोक्स मैदानात उतरला. 

हारकर जीतने वाले को बाजीगर कहते है! ऋषभ पंतसारखा तुटलेला हात गळ्यात घेऊन गेला बॅटिंगला; भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याचा हिरो

Chris Woakes Injury: हारकर जीतने वाले को बाजीगर कहते है... असचं काहीसे चित्र पहायला मिळाले. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू क्रिस वोक्स तुटलेला हात गळ्यात घेऊन मैदानात उतरला. संघाने सामना तर, जिंकला नाही पण, क्रिस वोक्सने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.  भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका बरोबरीत सुटला आहे.  ओव्हल कसोटीत टीम इंडियाचा शानदार विजय झाला आहे.  भारतानं मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली आहे. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हल कसोटी समान्यात खेळासाठीचे समर्पन काय असते याची झल पहायला मिळाली. सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू क्रिस वोक्सने दुसऱ्या डावात सर्वांचे मन जिंकले. भारताविरुद्धच्या सामन्यात आपल्या देशाला विजय मिळवून देण्यासाठी क्रिस वोक्स   खांद्याला दुखापत झाली असताना फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना वोक्सला दुखापत झाली. त्याच्या हाताला पट्टी बांधलेली होती, पण त्याचा उत्साह कमी झाला नाही. 

क्रिस वोक्स या कृतीचे कौतुक होत आहे. क्रिस वोक्समुळे टीमच्या सर्व खेळाडूंमध्ये उत्साह संचारला. पराभव दिसत असताना क्रिस वोक्सने शेवटपर्यंत प्रयत्न केला.  टीम इंडियाच्या जबरदस्त खेळीमुळे ही मॅच गेम चेंजर बनली. भारतीय खेळाडूंनी दमदार खेळी करत शेवटच्या दिवशी कसोटी सामना जिंकला. दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ 367 धावांवर आटोपला. भारताने 6 धावांनी सामना जिंकला. अशाप्रकारे मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. यापूर्वी, भारताने पहिल्या डावात 224 धावा काढल्या.  तर, दुसऱ्या डावात टीम इंडियाने 396 धावांचा डोंगर रचला. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 247 धावांवर बाद झाला.

क्रिस वोक्सनेची दमदार खेळी

पहिल्या डावात क्रिस वोक्सने 14 षटकार मारले. यादरम्यान त्याने 46 धावा काढत एक विकेट घेतली. त्याने केएल राहुलला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर, तो पहिल्या डावात फलंदाजी करू शकला नाही. त्याने भारताच्या दुसऱ्या डावातही गोलंदाजी केली नाही आणि इंग्लंडच्या दुसऱ्या डावात फलंदाजीला आला. वोक्सला एकही चेंडू खेळता आला नाही. तो एकही अकाउंट न देता नाबाद राहिला. इंग्लंडचा डाव जेमी ओव्हरटनच्या बाद झाल्याने संपला.

या मालिकेत भारताने शानदार कामगिरी केली. लीड्समधील पहिली कसोटी गमावल्यानंतर, टीम इंडियाने दमदार कमबॅक केले.  बर्मिंगहॅममधील दुसरा कसोटी सामना टीम इंडियाने जिंकला. या मैदानावर टीम इंडियाने पहिल्यांदाच विजय मिळवला. त्यानंतर, इंग्लंडने लॉर्ड्सवर पुनरागमन केले आणि मालिकेत आघाडी घेतली. मँचेस्टरमधील चौथी कसोटी अनिर्णित राहिली आणि मालिका अनिर्णित राहण्यासाठी भारताला ओव्हलवर जिंकावे लागले. त्यांनी एक रोमांचक सामना जिंकला आणि मालिका अनिर्णित राहिली.

 

Read More