Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

मोहम्मद सिराजवरून पाकिस्तानात हाणामारी वेळ, LIVE शोमध्ये दरम्यान माजी क्रिकेटर्स भिडले, Viral Video

Flight in Live show: पाकिस्तानमध्ये एका लाईव्ह शो दरम्यान, ओव्हल कसोटी सामन्यात टीम इंडियाला शानदार विजय मिळवून देणाऱ्या वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवरून दोन माजी क्रिकेटपटू एकमेकांशी भिडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

मोहम्मद  सिराजवरून पाकिस्तानात हाणामारी वेळ, LIVE शोमध्ये दरम्यान माजी क्रिकेटर्स भिडले, Viral Video

Clashed Live Show in Pakistan over Mohammad Siraj: ओव्हल टेस्टमध्ये भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या मोहम्मद सिराजवरून पाकिस्तानात जोरदार गोंधळ झाला आहे. एका लाईव्ह (LIVE) स्पोर्ट्स शोमध्ये दोन माजी पाकिस्तानी क्रिकेटर्स इतके भिडले की शेवटी हाणामारीची वेळ आली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच टेस्ट मॅचांच्या मालिकेत सर्वाधिक 23 विकेट्स घेणारा मोहम्मद सिराज सध्या चर्चेचा विषय आहे. मात्र पाकिस्तानात PTV स्पोर्ट्सवरील एका शोमध्ये माजी जलदगती गोलंदाज तनवीर अहमदने वादग्रस्त विधान केलं की, सिराज ‘टेस्ट दर्जाचा’ गोलंदाज नाही. यावर शोमध्ये उपस्थित दुसऱ्या माजी क्रिकेटर आणि पत्रकार आसिफ खानने आक्षेप घेतला आणि दोघांमध्ये जबरदस्त शाब्दिक चकमक झाली.

नक्की कशावरून वाद झाला?

PTV स्पोर्ट्सवर ओव्हल टेस्टवर चर्चा सुरू होती. शोमध्ये तनवीर अहमद म्हणाले की, भारताचे गोलंदाज एकाचजागेवर बॉलिंग करत होते.  विशेषतः सिराजने उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यावर आसिफ खानने त्यांना लगेच विचारलं, “तुम्ही तर सिराजला टेस्ट बॉलर मानतच नव्हता ना?” यावर तनवीर म्हणाले की, "हो, तो त्या दर्जाचा गोलंदाज नाही."

हे ही वाचा: Mohammed Siraj: मोहम्मद सिराजच्या कामगिरीचं BCCIकडून कौतुक, 'एवढ्या' रक्कमेचे मिळणार अतिरिक्त बक्षीस

 

तुमचं स्टँडर्ड काय आहे?”

यावर तनवीर भडकले आणि म्हणाले, “माझा स्टँडर्ड पाकिस्तान आहे. मी देशासाठी क्रिकेट खेळलोय. तुमचं स्टँडर्ड काय आहे?” आसिफ म्हणाले, “मी गेली 20-22 वर्षं पत्रकारितेत आहे. तुमच्या क्रिकेट कारकिर्दीइतकाच माझा अनुभव आहे.” यानंतर दोघांमध्ये चांगलीच तुफान जुंपली आणि एकमेकांवर टोलेबाजी करत राहिले. हा सगळा प्रकार लाईव्ह शोमध्ये घडला आणि सोशल मीडियावर याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.

हे ही वाचा: Mohammed Siraj: धार्मिक कारणामुळे सिराजने नाकारला 'हा' अवॉर्ड; केवळ मेडल घेऊन आला

 

तनवीर अहमदचा कसा आहे इतिहास? 

हे पहिल्यांदाच नाही आहे. याआधीही तनवीर अहमदने भारतीय क्रिकेट संघावर आणि बीसीसीआय (BCCI) वर अनेक वादग्रस्त टीका केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी विजयानंतर त्यांनी भारताच्या ट्रॉफीला “कचऱ्यात टाका” असं वक्तव्य केलं होतं. तसंच जय शाह आणि आयसीसी (ICC) वरही त्यांनी पिच भारताच्या बाजूने असल्याचा आरोप केला होता. आयपीएल (IPL 2025) दरम्यान तर त्यांनी सामना फिक्सिंगचेही आरोप केले होते.

 

हे ही वाचा: विराट कोहलीच्या बहिणीने मोहम्मद सिराजसाठी लिहिली भावनिक पोस्ट, सोशल मीडियावर Viral, म्हणाली "तो एक..."

 

मोहम्मद सिराजच्या कामगिरीने केवळ भारतातच नाही तर शेजारी देशातही खळबळ उडवली आहे. त्याचे प्रदर्शन किती प्रभावी होते हे यावरूनही लक्षात येते की पाकिस्तानात त्याच्या नावावरून वाद पेटले आहेत.

Read More