Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Corona : मोदींच्या आवाहनानंतर बीसीसीआयने तिजोरी उघडली

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांनी आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं. 

Corona : मोदींच्या आवाहनानंतर बीसीसीआयने तिजोरी उघडली

मुंबई : कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांनी आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं. मोदींच्या या आवाहनाला जगातलं सगळ्यात श्रीमंत बोर्ड असणाऱ्या बीसीसीआयने प्रतिसाद दिला आहे. बीसीसीआयने पीएम केयर्स फंडला ५१ कोटी रुपयांची मदत केली आहे. 'बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. जय शाह यांनी यासाठी सगळ्यांना एकत्र आणलं. जय शाह यांनीच बीसीसीआयचे अधिकारी आणि राज्य संघांशी चर्चा केली,' अशी प्रतिक्रिया बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली.

'बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह आणि बीसीसीआयच्या इतर अधिकाऱ्यांनी तसंच राज्य संघांनी शनिवारी पीएम केयर्स फंडला ५१ कोटी रुपये द्यायचा निर्णय घेतला आहे. देशाचं आपत्ती व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी आणि कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांना मदत म्हणून हा निधी देत आहोत,' असं बीसीसीआयने सांगितलं आहे. 

कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिकेची वनडे सीरिज रद्द करण्यात आली. तर आयपीएलदेखील पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Read More