टोकियो : जगभरात कोरोना विषाणूचा धोका वाढला आहे. चीनमध्ये ४०००च्या घरात बळींची संख्या गेली आहे. इराण, इटली येथेही कोरोनाबाधीत अनेकांचा मृत्यू झाला. येथील संख्याही ५००च्यावर गेली आहे. या कोरोनाच्या भीतीमुळे टोकियो ऑलिम्पिक २०२० पर्यंत पुढे ढकलण्याची शक्यता आहे. टोकियोचे प्रमुख ताकाहाशी यांनी याबाबत माहिती दिली आहे. उन्हाळ्यापर्यंत कोरोनाचे सावट कमी न झाल्यास ऑलिम्पिकचे निर्धारीत वेळापत्रक स्थगित केले जाईल.
टोकियोची २०२० ऑलिम्पिक सुरू होण्यास अनेक महिने आहेत. ही स्पर्धा जुलै २०२० ला सुरु होणार आहे. तरीही नियोजित कार्यक्रमावर संकट उभे राहिले आहे. जगता कोरोना विषाणूचा वाढता प्रसार आणि कोरोना बाधित लोकांचा मृत्यू. यामुळे टोकिओ ऑलिम्पिक घ्यायची का, की घेऊ नये, याचीच चर्चा सुरु झाली आहे. लोक कोरोना आजाराच्या वाढत्या परिणामांमुळे ही स्पर्धा पुढे जाऊ शकतात?
#BreakingNews । कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिक 2022 पर्यंत पुढे ढकलण्याची शक्यता । टोकियोचे प्रमुख ताकाहाशी यांची माहिती । उन्हाळ्यापर्यंत कोरोनाचं सावट कमी न झाल्यास निर्णय । ऑलिम्पिकचं निर्धारीत वेळापत्रक स्थगित करणारhttps://t.co/zUoGCpBnnh
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 11, 2020
#coronavirus #coronavirusindia #Corona pic.twitter.com/tS7Bx6csBv
दरम्यान, २०२० ऑलिम्पिक स्पर्धा टोकियो मध्येच होतील असेही सांगण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता २०२० उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा कोणताही विचार नसल्याचे जपानने याआधी स्पष्ट केले आहे. टोकियो इथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीबरोबरच्या बैठकीत टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक आयोजन समितीचे प्रमुख योशिरो मोरी यांनी ही माहिती दिली.
२०२० उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा २४ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान टोकियो इथे होणार आहेत.