Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Corona : अंपायर मदतीला धावला, बेरोजगारांसाठी स्वत:च्या हॉटेलमध्ये फुकट जेवण

कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. 

Corona : अंपायर मदतीला धावला, बेरोजगारांसाठी स्वत:च्या हॉटेलमध्ये फुकट जेवण

लाहोर : कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत २० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. पाकिस्तानमध्येही कोरोनाशी लढण्यासाठी नागरिक एकमेकांची मदत करत आहेत. पाकिस्तानी अंपायर अलीम दार यांनी त्यांच्या हॉटेलचे दरवाजे गरजूंसाठी उघडले आहेत.

पाकिस्तानमध्ये आतापर्यंत कोरोनाचे १२०० रुग्ण आढळले आहेत, तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे. संकटाच्या या काळात अंपायर अलीम दार मदतीला धावले आहेत. ५१ वर्षांच्या अलीम दार यांनी ३८६ आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये अंपायरिंग केल्याचा विश्वविक्रम केला आहे.

अलीम दार पाकिस्तानमध्ये दार्स डिलाइटो (Dar's Delighto)नावाचं रेस्टॉरंट चालवतात. कोरोनामुळे जे लोक बेरोजगार झाले आहेत, त्यांना या रेस्टॉरंटमध्ये फुकट जेवण मिळेल, अशी घोषणा हॉटेल प्रशासनाने केली आहे.

'कोरोना व्हायरस जगभरात पसरला आहे. पाकिस्तानही यातून वाचलेला नाही. आपल्या सहयोगाशिवाय सरकार याचं नियंत्रण करु शकत नाही. सरकारने आखून दिलेल्या नियमांचं आपण पालन केलं पाहिजे. लॉकडाऊनमुळे अनेक लोकं बेरोजगार झाली आहेत. लाहोरमध्ये माझं एक हॉटेल आहे. ज्या लोकांची नोकरी कोरोनामुळे गेली आहे, ते माझ्या हॉटेलमध्ये येऊन खाऊ शकतात,' असं अलीम दार म्हणाले आहेत.

कोरोना  व्हायरसचा फटका जगभरातल्या क्रीडा स्पर्धांना बसला आहे. २०२० सालची आयपीएलही कोरोनामुळे १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. एवढच नाही तर स्पर्धा रद्द होण्याचीही शक्यता आहे. कोरोनामुळे टोकयो ऑलिम्पिक स्पर्धाही एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. 

Read More