Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

मॅक्लियोडच्या तुफानी शतकाच्या जोरावर स्कॉटलँडने अफगाणिस्तानवर खळबळजनक विजय

  केलम मॅक्लियोडच्या आक्रमक शतकाच्या (१५७ नाबाद) जारावर स्कॉटलँडने वर्ल्ड कप क्लालिफाइंग स्पर्धेतील ग्रुप बीमध्ये अफगाणिस्तानला ७ विकेटने पराभूत करून मोठा उलटफेर केला आहे. 

मॅक्लियोडच्या तुफानी शतकाच्या जोरावर स्कॉटलँडने अफगाणिस्तानवर खळबळजनक विजय

बुलावायो :  केलम मॅक्लियोडच्या आक्रमक शतकाच्या (१५७ नाबाद) जारावर स्कॉटलँडने वर्ल्ड कप क्लालिफाइंग स्पर्धेतील ग्रुप बीमध्ये अफगाणिस्तानला ७ विकेटने पराभूत करून मोठा उलटफेर केला आहे. 

या स्पर्धेचा प्रबळ दावेदार असलेल्या अफगाणिस्तानला नमविल्याने स्पर्धेत आता इंटररेस्ट निर्माण झाला आहे. 

अफगाणिस्तानचा डाव ४९.४ षटकात २५५ वर गुंडाळला गेला. २५६ धावांचा पाठलाग करताना स्कॉटलंडने १६ चेंडूत राखत ३ विकेट गमावून लक्ष्य पूर्ण केले. स्कॉटलँडने आपली पहिली विकेट १६ धावसंख्येवर गमावली. त्यानंतर मॅक्लियोड क्रिजवर आल्यावर त्याने धमाकेदार फलंदाज केली. त्याला रिची बॅरिंगटन (६७) धावांची सथ दिली. दोघांनी द्विशतकीय भागीदारी केली. मॅक्लियोड १४६ चेंडूत २३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद १५७ धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. हे त्याचे वनडेतील सहावे शतक आहे. 

यापूर्वी अफगाणिस्तानने मोहम्मद नबी (९२) आणि नजीबुल्लाह जादरान (६७) याने चांगली फलंदाजी केली. नबी ८ धावांनी शतकापासून दूर राहिला. 


झिम्बाब्वे, यूएई आणि आयर्लंड विजयी 

झिम्बाब्वेने ग्रुप बीच्या इतर सामन्यात नेपाळला ११६ धावांनी पराभूत केले. झिम्बाब्वेने ३८० धावांचा डोंगर रचला. पण नेपाळला ५० षटकात ८ विकेटवर २६४ धावा करता आल्या. गुप एच्या दोन्ही मॅच पावसामुळे बाधित झाले. यूएईने पापुआ न्यू गिनीला डकवर्थ लुईस पद्धतीने ५६ धावांनी पराभूत केले. तर आयर्लंडने नेदरलँडला डकवर्थ लुईस पद्धतीने ९३ धावांनी पराभूत केले. 

Read More