Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

ऋषभ पंत खरंच म्हणाला मला RCB चा कॅप्टन करा? सोशल मीडिया पोस्ट होतेय व्हायरल

Rishabh Pant IPL 2025 : मेगा ऑक्शनपूर्वी अनेक खेळाडूंचं नाव विविध फ्रेंचायझीशी जोडलं जात आहे. असे असताना सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत असून ती पाहून ऋषभ पंत भडकलाय. 

ऋषभ पंत खरंच म्हणाला मला RCB चा कॅप्टन करा? सोशल मीडिया पोस्ट होतेय व्हायरल

Rishabh Pant IPL 2025 : 2024 च्यावर्षा अखेरीस आयपीएल 2025 साठी मेगा ऑक्शन पार पडणार असून त्याविषयी अनेक बातम्या समोर आल्या आहेत. मेगा ऑक्शन 2025 च्या रिटेन्शन पॉलिसीबबाबत येत्या एक ते दोन दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल. रिपोर्ट्सनुसार बीसीसीआय मेगा ऑक्शनसाठी राइट टू मैच कार्ड (RTM) हा पर्याय हटवून 5 खेळाडूंना रिटेन करण्यासाठी संघांना सूट देण्याबाबत विचार करत आहे. मात्र असे असताना सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत असून ती पाहून ऋषभ पंत भडकलाय. 

मेगा ऑक्शनपूर्वी अनेक खेळाडूंचं नाव विविध फ्रेंचायझीशी जोडलं जात आहे. यात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्या नावाचा समावेश आहे. 26 सप्टेंबर रोजी एक्स या सोशल मीडियावरून राजीव या युझरने एक ट्विट करत लिहिले की, "आरसीबीच्या कर्णधारपदाची जागा रिक्त असलेली पाहून पंतने या आठवड्याच्या सुरुवातीला त्याच्या मॅनेजरद्वारे आरसीबीशी संपर्क साधला. परंतु आरसीबीच्या व्यवस्थापनाने त्याला नकार दिला. भारतीय संघात तसेच दिल्ली कॅपिटल्समधील राजकीय डावपेचांमुळे विराट पंतला आरसीबीमध्ये घेऊ इच्छित नाही". राजीव या युझरने आरसीबी सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली.  ऋषभ पंत आरसीबीचा कर्णधार बनण्यासाठी उत्सुक आहे अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली. तेव्हा ऋषभ पंतने स्वतः ट्विट करून ही बातमी खोटी असल्याचे सांगितले. 

व्हायरल झालेली सोशल मीडिया पोस्ट : 

fallbacks

 

हेही वाचा : BCCI च्या निर्णयामुळे मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढल्या, रोहित, हार्दिक, बुमराह, सूर्यकुमार पैकी कोण होणार रिलीज?

 

काय म्हणाला ऋषभ पंत? 

ऋषभ पंतने व्हायरल होणाऱ्या पोस्टवर कमेंट केली आणि लिहिले, " ही खोटी बातमी आहे. तुम्ही सोशल मीडियावर एवढ्या खोट्या बातम्या का पसरवता? हे खूप वाईट आहे. विनाकारण अविश्वासार्ह वातावरण निर्माण करू नका. ही पहिली वेळ नाही आणि शेवटचीही नाही पण मला हे सांगावे लागले. कृपया तुमचे तथाकथित स्त्रोत पुन्हा तपासा. दररोज हे खूप  वाईट होत चाललं आहे. बाकी हे तुमच्यावर अवलंबून आहे. हे फक्त तुमच्यासाठी नाही तर चुकीची माहिती पसरवणाऱ्या लोकांसाठी आहे". 

काय असणार नवा नियम? 

सामान्यपणे दर 5 वर्षांनी आयपीएलमध्ये मेगा ऑक्शन पार पडतं. यंदा 2024 च्या अखेरीस आयपीएल 2025 साठी मेगा ऑक्शन होणार असून यापूर्वी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये प्रत्येक टीमला त्यांचे 4 खेळाडू रिटेन करण्याची सवलत दिली जायची. यात टीमला 4 पैकी 3 भारतीय आणि एक विदेशी खेळाडू तर 2 भारतीय आणि 2 विदेशी खेळाडू रिटेन करता यायचे. मात्र आता समोर येत असलेल्या रिपोर्ट्समध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार यंदा बीसीसीआय प्रत्येक फ्रेंचायझीला प्रत्येकी 5 खेळाडू रिटेन करण्याची परवानगी देऊ शकते. ज्यात 3 भारतीय आणि 2 विदेश खेळाडूंचा समावेश असेल. 

Read More