Amit Mishra Wife Allegations: मोहम्मद शमीनंतर आता एका भारतीय क्रिकेटपटू अडचणीत आला आहे. या क्रिकेटपटूवर त्याच्या पत्नीने छळ केल्याचा आरोप केला आहे. एवढंच नाही तर त्याचे महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा खुलासाही तिने केला आहे. हा खेळाडू आयपीएल 2025 मध्ये 171 विकेट घेणारा भारतीय क्रिकेटपटू आहे. हा क्रिकेटपटू म्हणजे अमित मिश्रा हा आहे. क्रिकेटपटू अमित मिश्रावर त्याच्या पत्नीचा (Garima Mishra) छळ केल्याचा आरोप आहे. शनिवारी, त्यांची पत्नी गरिमा मिश्रा यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली आणि आरोप केला की त्यांचा पती आणि सासरचे लोक अतिरिक्त हुंड्यासाठी त्यांचा छळ (Extramarital Affairs and Dowry Harassment) करत आहेत. पतीचे इतर महिलांशी अवैध संबंध आहेत. यामुळे तो त्यांना त्रास देत आहे. मात्र अमित मिश्राने हे सगळे आरोप फेटाळून ते निराधार असल्याचे म्हटले आहे.
अमित मिश्रा यांच्या पत्नी गरिमा यांनी त्यांच्यावर अनेकवेळा मारहाण केल्याचाही आरोप केला आहे. याशिवाय अमित मिश्राची पत्नी गरिमा मिश्राने, 'कधीकधी मला दिवसभर उपाशी राहावे लागायचे.' असेही आरोप केले आहेत. अमितची पत्नी गरिमा यांनी सांगितले की, त्यांचे लग्न 26 एप्रिल 2021 रोजी झाले. तिला होंडा सिटी कार आणि १० लाख रुपयांच्या हुंड्यासाठी त्रास देण्यात आला. यानंतर ती तिच्या पतीसोबत किडवाई नगर आरबीआय कॉलनीत राहू लागली. तिथेही सासरचे लोक हस्तक्षेप करत राहिले. पोलिस आयुक्तांना भेटताना पती आणि सासरच्या लोकांनी पैशासाठी छळ केल्याचा आरोप गरिमाने केला आहे.
गरिमाच्या म्हणण्यानुसार, अमित मिश्राचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप तिने केला आहे.
हे ही वाचा: पराभवानंतर धोनीचा राग अनावर... अंपायरलाच सुनावले, 'हे' ठरले पराभवाचे कारण? Video Viral
अमित मिश्रा लेग स्पिन गोलंदाजी करतो. तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. अमित मिश्रा भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. त्याला आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांमध्येही गणले जाते. पण सध्या तो क्रिकेट सामन्यांपासून दूर आहे. त्याने आता क्रिकेट सोडून कानपूरमधील रिझर्व्ह बँकेत काम करत आहे.
हे ही वाचा: MI vs CSK सामन्यात सीएसकेचे खेळाडू काळ्या पट्ट्या बांधून का आहे? समोर आले मोठे कारण
अमित मिश्राने 2003 मध्ये भारतासाठी एकदिवसीय आणि 2008 मध्ये कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर 2010 मध्ये अमितला T-२० आंतरराष्ट्रीय खेळण्याची संधी मिळाली. आजवर अमितने भारतासाठी 22 कसोटी सामन्यात 76, 36 एकदिवसीय सामन्यात 64 आणि 10 टी-20 सामन्यात 16 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने 162 आयपीएल सामनेही खेळले आहेत. ज्यामध्ये त्याच्या नावावर 174 विकेट्स आहेत.