IPL 2025 : आयपीएल 2025 सुरु होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा खेळाडू नितीश राणा (Nitish Rana) याने त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. नितीश राणाची पत्नी सांची मारवाह (Sanchi Marvah) ही गरोदर असून लवकरच आई होणार आहे. दोघे लवकरच जुळ्या मुलांचे आई-बाबा होणार असून याबाबत नितीशने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. नितीश राणा हा मागील काही वर्षांपासून कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत होता, तसेच त्याने श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्व सुद्धा केलं. मात्र 31 वर्षीय नितीश राणा याला आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी केकेआरने रिटेन केलं नाही, आणि ऑक्शनमध्ये त्याला राजस्थानने खरेदी केलं.
नितीश राणाने पत्नी सांची सोबत एक फोटो पोस्ट केला. त्याने याला कॅप्शन देत लिहिले की, 'स्टेडियम पासून ते साइट विजिट पर्यंत, आमच्या सर्वात मोठ्या प्रोजेक्टवर लवकरच दोन लहान टीममेट्स येतायत'. नितीश राणा हा एक विस्फोटक फलंदाज असून तो पार्ट टाइम स्पिनर सुद्धा आहे. नितीश राणाची पत्नी सांची ही बॉलिवूड अभिनेता गोविंदा याची नात्याने भाची आहे. त्यामुळे गोविंदा सुद्धा लवकरच आजोबा होणार आहे.
हेही वाचा : कोणत्या खेळाडूला मिळणार गोल्डन बॅट आणि बॉल? 'हे' खेळाडू शर्यतीत, फायनलनंतर होणार घोषणा
सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये दिल्लीकडून खेळताना नितीश राणा याने महत्वाचे योगदान दिले होते. या टूर्नामेंटमध्ये त्याने सर्वाधिक 299 धावा केल्या होत्या. ज्यात 21 षटकारांचा समावेश होता. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स सुद्धा बाबा बनला असून त्याच्या पत्नीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. जिचं नाव ईडी असं ठेवण्यात आलंय. त्याने सुद्धा मुलीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
नितीश राणा आणि सांची मारवाह यांची लव्हस्टोरी फिल्मी आहे. दोघांची पहिली भेट एका पार्टीमध्ये झाली होती असं म्हटलं जातं. पहिल्याच नजरेत सांचीवर नितीशचं प्रेम जडलं होतं. सांची दिसायला खूप सुंदर असून स्टाईल स्टेटमेंटमध्ये तर ती बॉलिवूड अभिनेत्रींना मात देते. कालांतराने दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं आणि 2018 मध्ये त्यांनी साखरपुडा केला. तर एक वर्षांनी 2019 मध्ये दोघे लग्नबंधनात अडकले.