Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Prithvi Shaw: पृथ्वी शॉचं मैदानावर पुनरागमन! मुंबईकडून दुरावा, आता या' संघाने केलं जवळ

Prithvi Shaw joined new Team: पृथ्वी शॉने गेल्या महिन्याच्या अखेरीस मुंबई क्रिकेट असोसिएशनला मुंबई सोडून दुसऱ्या राज्याकडून खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती केली होती, जी प्रशासकीय समितीने मंजूर केली.  

Prithvi Shaw: पृथ्वी शॉचं मैदानावर पुनरागमन! मुंबईकडून दुरावा, आता  या' संघाने केलं जवळ

Prithvi Shaw in Maharashtra Cricket Team: टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज पृथ्वी शॉ आता महाराष्ट्र संघाकडून खेळताना दिसणार आहे. मुंबईकडून दूर जाऊन त्यांनी महाराष्ट्र संघाची निवड केली असून, सोमवारी २०२५-२६ हंगामापूर्वी महाराष्ट्रात दाखल झाला. याची घोषणा राज्य प्रशासकीय मंडळाने केली आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस शॉने मुंबई क्रिकेट असोसिएशनला मुंबई सोडून दुसऱ्या राज्याकडून खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती केली होती. ही विंनती मान्य करत प्रशासकीय मंडळाने मंजूर केली.

मुंबई संघाला रामराम

मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे पृथ्वी शॉने काही आठवड्यांपूर्वी 'नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट' (NOC) मागितले होते, जे मंजूर करण्यात आले. त्यानंतर त्यांनी अधिकृतपणे मुंबईचा निरोप घेतला आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनशी हात मिळवणी केली. मुंबई संघातून त्यांना गेल्या काही काळात वगळण्यात आले होते. फिटनेस आणि शिस्तभंगाच्या कारणांमुळे त्याला वगळण्यात आले होते. त्याने अखेरचा सामना मुंबईकडून सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशविरुद्ध खेळला होता.

हे ही वाचा: 'चुकीच्या लोकांशी...', पृथ्वी शॉने सांगितलं अपयशामागील खरं कारण; खुलासा करत म्हणाला 'मी आयुष्यात खूप...'

 

महाराष्ट्र संघात नवसंजीवनी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने त्यांच्या आगमनाची अधिकृत घोषणा करताना म्हटलं, “पृथ्वी शॉ यांचं महाराष्ट्र संघात येणं हे भारतीय स्थानिक क्रिकेटसाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे. त्यांच्या आक्रमक शैलीमुळे संघाला बळ मिळेल.” पृथ्वीने भारतासाठी सर्व तीन फॉरमॅटमध्ये (टेस्ट, वनडे, टी२०) प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांची IPL मधील कामगिरी देखील अनेकदा संघासाठी निर्णायक ठरली आहे.

हे ही वाचा: पृथ्वी शॉ, निधी तापडिया आणि ती! खेळाडूला मिळाली 'नवीन गर्लफ्रेंड'? चेहरा लपवतानाचा Video Viral

 

पृथ्वी शॉ यांची प्रतिक्रिया

आपल्या निर्णयाबाबत बोलताना पृथ्वी  शॉ म्हणाला,“या टप्प्यावर मला वाटतं की महाराष्ट्र संघात जाणं हे माझ्या क्रिकेट प्रवासासाठी योग्य पाऊल ठरेल. मुंबईकडून खेळताना मला खूप काही शिकायला मिळालं. त्या संधींसाठी मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा कायम ऋणी राहीन. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने गेल्या काही वर्षांत खेळाच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी प्रगती केली आहे. अशा सकारात्मक वातावरणाचा फायदा मला निश्चितच होईल. ” असेही त्याने नमूद केले.

हे ही वाचा: Video: सामना जिंकल्यावर कर्णधार शुभमन गिल घेतोय 'या' व्यक्तीचा शोध, कोण हरवलं आहे? जाणून घ्या

 

 

रोहित पवारांचं वक्तव्य

MCA अध्यक्ष रोहित पवार यांनी देखील शॉच्या समावेशाचे स्वागत करत म्हटलं की  “पृथ्वी शॉसारखा अनुभवी खेळाडू आमच्या संघात आल्याने, रुतुराज गायकवाड, अंकित बावणे, राहुल त्रिपाठी, मुकेश चौधरी आणि रजनीश गुर्बानी यांसारख्या खेळाडूंना अधिक मजबुती मिळेल. IPL आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचा त्याचा अनुभव आमच्या युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा ठरेल.”

Read More