Rinku Singh And Priya Saroj : भारताचा स्टार क्रिकेटर रिंकू सिंह आणि उत्तरप्रदेशच्या मछलीशहर येथील खासदार प्रिया सरोज हे दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. यावर्षीच्या सुरुवातीला दोघांचं लग्न फिक्स झालं होतं त्यानंतर आता आयपीएल संपत असताना या दोघांच्या लग्नाची बातमी समोर आली असून लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.
दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा रविवारी म्हणजेच 8 जून रोजी लखनऊच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे. तर त्यांचं लग्न हे 18 नोव्हेंबर रोजी वाराणसी येथील हॉटेल ताजमध्ये होईल. रिंकू सिंह हा भारताचा स्टार क्रिकेटर असून टी 20 मधील फिनिशर आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईटरायडर्सचा महत्वाचा खेळाडू आहे. दुसरीकडे त्याची होणारी पत्नी प्रिया सरोज समाजवादी पार्टीच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडणून आलीये. अशातच रिंकू आणि प्रिया यांच्या लग्नाला, राजकीय, क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्रातील काही मान्यवर व्यक्ती उपस्थित असतील अशी शक्यता आहे.
प्रिया सरोज उत्तर प्रदेशातील मच्छलीशहरमधून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आल्या. या विजयामुळे त्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहात निवडून आलेल्या दुसऱ्या सर्वात तरुण उमेदवार ठरल्या. तुफानी सरोज या समाजवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत, या कनेक्शनमुळेच अखिलेश यादव यांनी प्रिया सरोज यांना तिकीट देऊन त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. समाजवादी पक्षाच्या खासदार असण्यासोबतच सुप्रीम कोर्टात वकील असून प्रॅक्टिसही करतात. प्रिया सरोज कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना नेहमीच सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असायची. दिल्ली विद्यापीठातून बीए आणि नोएडा येथील एमिटी विद्यापीठातून एलएलबीची पदवी प्राप्त केली आहे.
हेही वाचा : IPL ट्रॉफीची किंमत किती असते माहितेय? झळाळती ट्रॉफी खरंच सोन्याची असते का? किंमत ऐकून व्हाल थक्क
रिंकू सिंहने आयपीएलमध्ये 58 सामने खेळले असून यात 1099 धावा केल्या आहेत. यात त्याने 4 अर्धशतक केली आहेत. तर टी 20 मध्ये सुद्धा भारतीय संघाकडून त्याच पदार्पण झालं असून त्यानं 546 धावा केल्या आहेत. यात त्याने 3 अर्धशतक ठोकली यासह 2 विकेट सुद्धा घेतले. तर वनडे क्रिकेटमध्ये त्याने 2 सामन्यात त्याने 55 धावा केल्या असून 1 विकेट सुद्धा घेतली आहे.