Shikhar Dhawan and Sophie Shine: टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन चर्चेत असतो. त्याच्या खेळामुळे तर कधी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे. पण गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) च्या पहिल्याच सामन्यात शिखर हा एका मुलीसोबत दिसला. तेव्हापासून शिखर सोबत ती मुलगी याची चर्चा सुरु झाली. काही काळातच ती सोफी शाइन आहे असं समजलं. ती धवनसोबत अनेक वेळा दिसली आहे. पण त्याच्या नात्यावर अधिकृतरीत्या काहीच माहिती समोर आली नव्हती. पण अखेरीस गब्बरने सोशल मीडियावर उघडपणे त्याचे प्रेम व्यक्त केले आहे. सोफीने एक दोघांचा एक फोटो शेअर केला असून त्याला छानस कॅप्शन दिलं आहे. तिने अशी पोस्ट शेअर केली आहे की चाहते कमेंटमध्ये 'नवीन भाभी' लिहित आहेत. धवन आणि सोफी शाइनचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
धवन आणि सोफी शाइनने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघेही एकत्र बसलेले दिसत आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये 'माय' नंतर एक हार्ट इमोजी आहे, ज्याला सोशल मीडियाच्या भाषेत 'माय लव्ह' असे म्हटले जाते. सोफी आणि धवन क्रिकेटचे सामने बघताना ते विमानतळावर आणि आता प्रत्यक्ष जीवनातही एकत्र दिसले आहेत. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत.
हे ही वाचा: "मला तुझ्यासोबत राहायचंय..." शिखर धवनच्या नवीन गर्लफ्रेंडने जगजाहीर केलं नातं, Video Viral
हे ही वाचा: Mary Kom Divorce: मेरी कोमने पतीपासून घेतला घटस्फोट, अफेअरच्या अफवांचे केले खंडन
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोफी शाइन ही आयर्लंडची आहे. ती उत्पादन सल्लागार म्हणून काम करते. ती सध्या नॉर्दर्न ट्रस्ट कॉर्पोरेशनमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करते आणि सध्या अबू धाबी येथे राहते. तिने आयर्लंडमध्येच आपले शिक्षण पूर्ण केले. गेल्या काही महिन्यांपासून सोफी शाइन आणि धवनमध्ये चांगले संबंध दिसून येत आहेत.
हे ही वाचा: शिखर धवनने शाहिद आफ्रिदीला दाखवून दिली आपली जागा; म्हणाला, " आम्ही तुम्हाला कारगिलमध्येही..."
शिखर धवनने २०१२ मध्ये आयशा मुखर्जीशी लग्न केले. पण लग्नाच्या काही वर्षांनी दोघांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या पसरू लागल्या. २०२१ मध्ये धवनने दिल्ली उच्च न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. २०२१ मध्ये दोघांनीही त्यांच्या वेगळं झाल्याचे सांगितले.आता त्याने नवीन नात्याची पुष्टी देखील केली आहे.