मुंबई : क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या मास्टर ब्लास्टर म्हणजेच क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्या मैत्रीचे किस्से काही कमी नाहीत. सोशल मीडियाच्या वर्तुळात तर, ही मित्रांची जोडी कायम चर्चेचा विषय ठरते. यातच आता आणखी एक भर पडली आहे. कारण, विनोद कांबळीने सचिनचं आव्हान स्वीकारत एक धमाकेदार रॅप तयार केलं आहे.
काही दिवसांपूर्वीच सचिनने 'क्रिकेटवाली बिट'पे एक रॅप साँग तयार करण्याचं आव्हान विनोदला दिलं होतं. जे स्वीकारत विनोदने अतिशय फिल्मी अंदाजात रॅप सादर केलं आहे. मुख्य म्हणजे खुद्द सचिनलाही विनोदचा हा 'यो' अंदाज अतिशय भावला असून, त्याने आपल्या मित्राची खास शैलीत प्रशंसा केली आहे.
विनोद कांबळीने रॅप साँगचा व्हिडिओ पोस्ट करत त्यासोबत कॅप्शनही लिहिलं आहे. 'डियर मास्टर ब्लास्टर... एक बार जो मैने कमिटमेंट कर दी, तो मै खुदकी भी नही सुनता... कसं वाटलं?', असं विचारत विनोदने सचिनपुढे हे रॅप सादर केलं.
That was really impressive, @vinodkambli349!
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 12, 2020
Looks like there's a new rapper in town. https://t.co/kPT6kntHuC
पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ
विनोदने सादर केलेल्या या रॅपच्या व्हिडिओला, पंधार हजारहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे. तर, अनेकांनी रिट्विट करत या नव्या आणि अनोख्या रॅपरला दादही दिली आहे. विनोद कांबळीने सादर केलेल्या या रॅपमध्ये अनेक क्रिकेटपटूंचा अंदाज आहे. व्हिडिओच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एका रॅपरच्याच अंदाजात असणाऱ्या विनोदचा हा व्हिडिओ इतर रॅपर्सना टक्कर देतोय, असं म्हणायला हरकत नाही.