Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

घोर निराशा...! विराटचा Video पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर, त्या तरुणाविषयी इतकं वाईट का वाटतंय?

Virat Kohli Video : चाहत्याला धक्का की...? विराटचा व्हिडीओ पाहून नेटकरी का म्हणतायत, ज्यांना आदर्श मानता त्यांना कधीच भेटू नका   

घोर निराशा...! विराटचा Video पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर, त्या तरुणाविषयी इतकं वाईट का वाटतंय?

Virat Kohli Video : भारतीय क्रिकेट संघामध्ये उल्लेखनीय कामगिरीचा टप्पा सर केल्यानंतर विराट कोहलीनं काही आव्हानात्मक दिवसांचाही सामना केला. इथंही योग्य समतोल साधत त्यानं काही दिवस स्वत:साठी आणि कुटुंबासाठी वेळ काढल्याचं पाहायला मिळालं. गेल्या काही दिवसांपासून विराट त्याच्या अध्यात्मिक भेटीगाठी करण्यापासून अगदी अलिबागच्या घराला भेट देईपर्यंत बऱ्याच कामांमध्ये व्यग्र दिसत आहे. 

विराटचे असंख्य व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरलही होत आहेत. स्टार खेळाडूला पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये कमालीचा आनंद अगदी स्पष्टपणे दिसून येतोय. पण, या साऱ्यामध्ये विराटचं वागणं मात्र काहींना खटकतंय. सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ आणि त्या व्हिडीओवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहता ही बाब नाकारता येत नाही. 

काही दिवसांपूर्वीच विराट त्याच्या पत्नीसह म्हणजे अनुष्का शर्मासह अलिबागच्या फार्महाऊसवर गेल्याचं पाहायला मिळालं. याचदरम्यान असंख्य रील (Reel) सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यातीलच एका व्हिडीओमध्ये विराट विचित्र वागण्यामुळं सर्वांना धक्का देताना दिसतोय. समोर किंग कोहली दिसताच मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया इथं चाहत्यांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. 

हेसुद्धा वाचा : BCCI चा भारतीय खेळाडूंना मोठा धक्का! 10 Point Policy लागू; गंभीरमुळे सगळेच अडकले

 

जेट्टीपाशीच एका तरुण चाहत्यानं मोठ्या आनंदात सेल्फी घेण्यासाठी म्हणून कोहलीपुढे मोबाईलही धरला. पण, 'भाई मेरा रास्ता मत रोको...' असं म्हणत विराटनं हातानं त्या चाहत्याला दूर लोटलं आणि त्याच्या अंगरक्षकांनी त्याला आणखी मागे केलं. बस्स... मग काय? विराटच्या या वागण्यानं नेटकऱ्यांनी मात्र नाराजीचा सूर आळवला.

'विराटनं किती रागात सेल्फी काढण्यासाठी आलेल्या त्या चाहत्याला ढकललं...', इथपासून सेल्फी घेणाऱ्या त्या मुलानं आपला आदर्श विचारपूर्वक निवडावा, ... म्हणून कधीच आपल्या आदर्शस्थानी असणाऱ्या व्यक्तींना भेटू नये.... विराटनं हे योग्य नाही केलं... इथपर्यंतच्या कमेंटचा भडीमार या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये केला. सेलिब्रिटी, त्यांच्याभोवती असणारा चाहत्यांचा गराडा आणि त्यांचं हे असं वागणं याविषयी तुम्हाला काय वाटतं? 

Read More