Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Bangladesh Protests: अराजक बांगलादेशात क्रिकेटपटू असुरक्षित; मैदानाबाहेर कर्फ्यू!

Bangladesh Protests: मिळालेल्या माहितीनुसार, या परिस्थितीमुळे बांगलादेश क्रिकेट टीमच्या सरावात अडथळा येत असल्याचं समोर आलंय. कर्फ्यूमुळे बांगलादेशी खेळाडू मैदानावर सराव करू शकत नाहीत. 

Bangladesh Protests: अराजक बांगलादेशात क्रिकेटपटू असुरक्षित; मैदानाबाहेर कर्फ्यू!

Bangladesh Protests: बांगलादेशात सध्या अस्थिर परिस्थिती पहायला मिळतेय. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन प्रचंड हिंसाचार सुरु आहे.  दरम्यान अशातच बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा दिला आहे. यावेळी त्या बांगलादेश सोडून भारतात आल्या आहेत. सुरु असलेल्या हिंसाचारामुळे कर्फ्यू लावण्यात आला असून याचा परिणाम पाकिस्तानसोबत सुरु असलेल्या टेस्ट सिरीजवर होताना दिसतोय. 

मिळालेल्या माहितीनुसार, या परिस्थितीमुळे बांगलादेश क्रिकेट टीमच्या सरावात अडथळा येत असल्याचं समोर आलंय. कर्फ्यूमुळे बांगलादेशी खेळाडू मैदानावर सराव करू शकत नाहीत. बीसीबी म्हणजेच बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी क्रिकबझला दिलेल्या माहितीनुसार, सराव सत्र कधी सुरू होईल हे त्यांना अद्याप माहित नाही. कारण शेख हसीना सरकारने देशभरात अनिश्चित काळासाठी कर्फ्यू जाहीर केला आहे.

बांग्लादेशाची टीम करणार पाकिस्तानचा दौरा

बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात 21 ऑगस्टपासून 2 टेस्ट सामन्यांची सिरीज खेळवली जाणार आहे. पाकिस्तान दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या या टेस्ट सिरीजमधील पहिला सामना 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान रावळपिंडीमध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा टेस्ट सामना कराचीत 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. या टेस्ट सिरीजसाठी बांगलादेशाची टीम 17 ऑगस्टला पाकिस्तानला रवाना होणार आहे.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पाकिस्तान दौऱ्यासाठी ते कधी सराव सुरू करतील हे त्यांना माहीत नाही. कारण, कर्फ्यू कधी संपणार आहे याबाबत कोणतीही कल्पना नाही. सध्या मॅनेजमेंटचं यावर लक्ष असून त्यांना सद्यस्थितीबाबत काही माहिती मिळताच ते आम्हाला कळवणार आहेत. 

कर्फ्यूमुळे बांगलादेशाच्या टीमची प्रॅक्टिस टळली

दंगलीमुळे बांगलादेशमध्ये रविवार 4 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजल्यापासून अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला होता. बांगलादेश क्रिकेट टीमने पाकिस्तानसोबतच्या टेस्ट सिरीजच्या तयारीसाठी 4 ऑगस्ट रोजी पहिलं सराव सत्र घेतलं होतं. हे प्रशिक्षण सत्र मुख्य प्रशिक्षक चंडिका हथुरासिंघे यांच्या नेतृत्वाखाली होणार होतं. ते 1 ऑगस्टलाच ढाकामध्ये पोहोचले होते. मुख्य प्रशिक्षकाव्यतिरिक्त बांगलादेश संघाचे अन्य सपोर्ट स्टाफ जसं की, स्पिन गोलंदाजी प्रशिक्षक मुस्ताक अहमद, वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक आंद्रे ॲडम्स, फलंदाजी प्रशिक्षक डेव्हिड हेम्प, सहाय्यक प्रशिक्षक निक पोथास आणि नॅथन केली हे देखील ढाकामध्ये आहेत.

Read More