Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

हार्दिक पांड्या आणि 'या' अभिनेत्रीच्या अफेअर्सच्या चर्चांना उधाण...

क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते काही नवीन नाही. 

हार्दिक पांड्या आणि 'या' अभिनेत्रीच्या अफेअर्सच्या चर्चांना उधाण...

नवी दिल्ली : क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते काही नवीन नाही. या क्षेत्रातील अनेक प्रेमकथा रंगल्या, गाजल्या आणि यशस्वीही झाल्या. तर काहींना थोड्या कालावधीतच पूर्णविराम लागला. अलीकडे सागरिका-झहीर आणि विराट-अनुष्का या क्रिकेट आणि बॉलिवूडमधील जोड्या विवाहबद्ध झाल्या. तर टीमइंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्याचा भाऊ क्रुणाल पांड्या डिसेंबरमध्ये विवाहबद्ध झाला. मात्र क्रुणालची बायको ही बॉलिवूड अभिनेत्री नसूनही त्याच्या लग्नात एका बॉलिवूड अभिनेत्रीने वर्णी लावली होती. त्यामुळे पुन्हा एकदा क्रिकेट आणि बॉलिवूडच कनेक्शनवर जोरदार चर्चा होऊ लागली आहे. त्यातील खरेपणा किती हे कळलेले नसले तरी क्रुणालच्या लग्नाच्या सर्व विधींना ही अभिनेत्री उपस्थित होती.

fallbacks

हार्दिक पांड्याचे नाव बिग बॉसमधून प्रसिद्धी झालेलेी अभिनेत्री एली अवराम सोबत जोडले गेले आहे. या अफेयरच्या चर्चांना क्रुणालच्या लग्नापासून उधाण आले आहे. 

fallbacks

एली अवराम मुंबईत झालेल्या लग्नात दिसली. लग्नात ती पांड्याच्या कुटुंबियांसोबत चांगलीच रमली होती. तिने बराच वेळ लग्नात घालवला. सोशल मीडियावर एलीचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला.

fallbacks

काही दिवसांपूर्वी परिणीती चोप्रा आणि हार्दिक पांड्याच्या चर्चांना उधाण आले होते. परिणीतीच्या ट्वीटला काही खास शैलीत उत्तर दिल्याने या चर्चांना सुरूवात झाली होती. 

fallbacks

परिणीतीपूर्वी हार्दिक चे नाव एका मॉडलशी जोडले गेले होते. मात्र त्या मॉडलने हार्दिक आपला मित्र असल्याचे सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला.

fallbacks

क्रुणाल पांड्या डिसेंबर २०१७ मध्ये गर्लफ्रेंड पंखुरी शर्मासोबत विवाहबद्ध झाला. त्याच्या लग्नाचे मेंहदी, संगीत, साखरपुडा, इतर विधींचे व्हिडिओज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.

fallbacks
लग्नात क्रुणाल आणि हार्दिक या दोन्ही भावांनी खूप धमाल केली. याचे व्हिडिओज आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

fallbacks

हार्दिक पांड्या सध्या टीमइंडियासोबत दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. केपटाऊनमध्ये झालेली पहिली टेस्ट मॅचमध्ये भारत ७२ रन्स पराभूत झाला आहे. 

fallbacks

भारत जरी मॅच हरला असला तरी हार्दिक पांड्याची जबरदस्त स्तुती होत आहे. संकटात सापडलेल्या इंडियन टीमला हार्दिक ने ९३ रन्स बनवून आणि दोन विकेट घेऊन सावरले होते.

fallbacks

क्रुणाल आणि पंखुरी गेल्या दीड वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. क्रुणालच्या लग्नामुळेच हे दोघे भाऊ विरुष्काच्या मुंबईतील रिसेप्शनला उपस्थित राहू शकले नाहीत.

fallbacks

क्रुणालचे लग्न मुंबईतील जुहूमधील जेडब्लू मॅरियट हॉटेलमध्ये झाले. लग्नाला अनेक किक्रेटर्सनी हजेरी लावली. विशेष म्हणजे या लग्नाला संपूर्ण अंबानी कुटुंबिय उपस्थित होते. त्याचबरोबर बीग बी अमिताभ बच्चन यांनीही नवविवाहीत दांपत्याला शुभार्शीवाद दिले.

fallbacks

हार्दिक पांड्या जलद गोलंदाजी करतो. त्याचबरोबर जबरदस्त फलंदाजीसाठी देखील ओळखला जातो. तर क्रुणाल पांड्या स्पिन बॉलर आहे आणि तितकाच ताकदीचा फलंदाजही. सचिन तेंडूलकरही हार्दिकचे तोंडभरून कौतुक करतो.

fallbacks

हे दोघे भाऊ मुंबई इंडियन्सच्या टिममध्ये होते आणि आयपीएल सीजन १० मध्ये त्यांनी जबरदस्त कामगिरी केली.

fallbacks

आयपीएल १० च्या सीजनची विजयी ट्रॉफीसोबत पंथुरी दिसल्यावर ती चर्चेत आली होती. ट्रॉफीसोबतचे तिचे काही फोटोजही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर ही मिस्ट्री गर्लबद्दल चर्चा होऊ लागली.

fallbacks

कोणी पहिल्यांदा प्रपोज केले यावर क्रुणाल म्हणाला, आयपीएल १० मध्ये मुंबई इंडियन्स चॅम्पियन झाल्यानंतर मी पंखुरीला प्रपोज केले. मला फायनल मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता. तेव्हा मला वाटले तिला प्रपोज करण्याची ही योग्य वेळ आहे.

fallbacks

प्रपोज केल्यानंतर पंखुरीने लगेच होकार दिला, असे क्रुणालने सांगितले. जर पार्टनर योग्य असेल तर रिलेशनशीप तुमच्या आयुष्याचा सुंदर भाग होऊन जातो, आणि त्याला योग्य साथीदार मिळाला आहे, असे क्रुणालला वाटते. 

fallbacks

Read More