Cristiano Ronaldo : फुटबॉलमध्ये वर्ल्डकपला सुरूवात झाली तर फुटबॉल विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डोला मॅन्चेस्टर युनायटेडने करारमुक्त केलं आहे. रोनाल्डोने नुकतीच ब्रिटीश पत्रकार पियर्स मॉर्गन यांना दिलेल्या वादळी मुलाखतीमुळे त्याला टीकेचा मोठा सामना करावा लागला होता. ही चूक रोनाल्डोला नडल्याचं बोललं जात आहे. या वादानंतर मॅंचेस्टर युनाटेडने हा निर्णय घेतला आहे. (cristiano ronaldoleave manchester united immediate effect official statement by club latest sport marathi news)
Cristiano Ronaldo is to leave Manchester United by mutual agreement, with immediate effect.
— Manchester United (@ManUtd) November 22, 2022
The club thanks him for his immense contribution across two spells at Old Trafford.#MUFC
मॅन्चेस्टर युनायडेट क्लबने यासंदर्भात ट्विट करत माहिती आहे. रोनाल्डो आणि क्लबने परस्पर सामंजस्याने करार संपवण्याचा निर्णय घेतला आहे. क्लबसाठी दिलेल्या सहाकार्याबद्दल संघाने रोनाल्डोचे आभार मानले असून त्याला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
रोनाल्डो 2021 मध्ये इंग्लिश क्लब मँचेस्टर युनायटेडशी संबंधित होता. दोघांमध्ये सुमारे 216 कोटी रुपयांची डील झाली होती. रोनाल्डो पूर्वी युव्हेंटसकडून खेळायचा. 2003-09 दरम्यान रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडचा देखील भाग होता.