Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

पराभवानंतर धोनीचा राग अनावर... अंपायरलाच सुनावले, 'हे' ठरले पराभवाचे कारण? Video Viral

MI vs CSK: आयपीएल 2025 मध्ये, धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेला सहाव्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतर धोनी अस्वस्थ दिसत होता आणि त्याने अंपायरला लक्ष्य केले.  

पराभवानंतर धोनीचा राग अनावर... अंपायरलाच सुनावले, 'हे' ठरले पराभवाचे कारण? Video Viral

Ms Dhoni Fight With Umpire: आयपीएल 2025 मध्ये, सीएसकेची धुरा सुरुवातीला ऋतुराज गायकवाड सांभाळत होता. पण नंतर झालेल्या दुखापतीमुळे तो यंदाच्या सामन्यातूनच बाहेर पडला. आता सीएसकेचे कर्णधारपद हे धोनीकडे सोपवण्यात आले. पंरतु धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेला सहाव्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. रविवारी वानखेडेवर झालेल्या सामन्यात मुंबईने सीएसकेचा 9 विकेट्सने ( MI vs CSK)  पराभव केला.या पराभवानंतर सीएसकेच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळजवळ संपल्या आहेत. धोनीने सामना जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण १७७ धावांचा बचाव करण्यात तो यशस्वी झाला नाही. सामना हरल्यानंतर धोनीचा संयम सुटला आणि अंपायरलाच सुनावले. याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

सीएसकेने ठेवले 176 धावांचे लक्ष्य

मुंबईने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना, रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे यांच्या अर्धशतकांच्या जोरावर सीएसकेने 176 धावांचे लक्ष्य ठेवले. पण या लक्ष्याचा बचाव करताना, सीएसकेची सर्व ताकद अपयशी ठरल्यासारखे वाटले. रोहित शर्माने किल्ला सांभाळला आणि 76 धावांची सामना जिंकणारी खेळी खेळली.

हे ही वाचा: 3 चेंडूत 24 धावा... दमदार रेकॉर्ड करणार 'या' भारतीय फलंदाजाला तुम्ही ओळखता का?

 

धोनी अंपायर का चिडला? 

मुंबईच्या फलंदाजीदरम्यान, 14 व्या षटकात, एमएस धोनी आणि अश्विनने अंपायरला नियमांनुसार नवीन चेंडू मागितला. पण अंपायरने नवीन चेंडू देण्यास स्पष्टपणे नाकारले. याच कारणांमुळे धोनी-अश्विन आणि अंपायर यांच्यात वाद झाला. परंतु अंपायर ठाम राहिले आणि नवीन चेंडू दिला नाही.  सामना हरल्यानंतर धोनीने यामुळेच चेंडू न दिल्याचा राग अंपायरवर काढला. सामना संपल्यानंतर धोनी अंपायरशी चेंडूबद्दल चर्चा करताना दिसला. धोनीचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

हे ही वाचा: IPL 2025 च्या मधेच कर्णधार पॅट कमिन्सने सोडली SRH ची साथ? पत्नीच्या पोस्टमुळे उडाली खळबळ

सीएसकेसाठी करा किंवा मरो असा सामना

मुंबईविरुद्धचा सामना सीएसकेसाठी 'करो या मरो'सारखा होता. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की, सीएसकेचे अजूनही ६ सामने बाकी आहेत. प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी संघाला सर्व सामने चांगल्या फरकाने जिंकावे लागतील. एका पराभवामुळे सीएसकेचा संपूर्ण खेळ खराब होऊ शकतो.

Read More