Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

CWG 2018 : केवळ युट्युबला गुरू मानून सुवर्णपदक पटकावणार्‍या नीरज चोप्राने रचला नवा इतिहास

  ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या 21 व्या कॉमनवेल्थ खेळामध्ये 10 व्या दिवशी नीरज चोप्राने भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. भालाफेक या खेळाप्रकारामध्ये सुवर्णपदकाची कमाई करणारा नीरज हा पहिला खेळाडू ठरला आहे.  

CWG 2018 : केवळ युट्युबला गुरू मानून सुवर्णपदक पटकावणार्‍या नीरज चोप्राने रचला नवा इतिहास

मुंबई :  ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या 21 व्या कॉमनवेल्थ खेळामध्ये 10 व्या दिवशी नीरज चोप्राने भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. भालाफेक या खेळाप्रकारामध्ये सुवर्णपदकाची कमाई करणारा नीरज हा पहिला खेळाडू ठरला आहे.  

डबल सेलिब्रेशन  

नीरज चोप्रा या खेळाडूच्या सुवर्ण कामगिरीमुळे भारताला पाचवं सुवर्णपदक मिळालं असलं तरीही भालेफेक या खेळातील पदकामुळे याचा भारतीयांना दुहेरी आनंद आहे. नीरजने फायनलअम्ध्ये 86.47 मीटरच्या अंतरावरून ही कामगिरी केली. या स्पर्धेमध्ये रजत पदक ऑस्ट्रेलियाच्या हेमिसह पिकॉकने कमावले. 

 

आधुनिक युगातला एकलव्य 

नीरज चोप्रा हा मूळचा हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील कांदरा गावातील आहे. नीरजचे वडील शेतकरी आहेत. नीरजने कधीच भालेफेक या खेळासाठी कोणत्याही प्रशिक्षकाकडून शिक्षण घेतलेले नाही. केवळ युट्युबवर काही व्हिडिओ पाहून त्याने या खेळातील ट्रिक्स शिकल्या. नीरज 20 वर्षीय असून कॉमनवेल्थ खेळात सुवर्णपदकाची कमाई करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. 

Read More