Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Norway Chess 2025: बुद्धिबळाच्या पटावरचा नवा 'राजा'! जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला भारताच्या डी. गुकेशने चारली पराभवाची धूळ

D Gukesh achieved a stunning victory over Magnus Carlsen: रविवारी नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या सहाव्या फेरीत भारताच्या डी गुकेशने पाच वेळा चॅम्पियन मॅग्नस कार्लसनचा पहिल्यांदाच क्लासिकल गेममध्ये पराभव केला.   

Norway Chess 2025: बुद्धिबळाच्या पटावरचा नवा 'राजा'! जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला भारताच्या डी. गुकेशने चारली पराभवाची धूळ

D Gukesh beats Magnus Carlsen: भारतीय बुद्धिबळपटू डी. गुकेशने इतिहास रचला आहे. गुकेशने शानदार कामगिरी करत नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा 2025 च्या सहाव्या फेरीत पाच वेळा विश्वविजेता असलेल्या मॅग्नस कार्लसनचा पराभव करून शानदार विजय नोंदवला. हा एक विश्वविजेता मॅग्नस कार्लसनला क्लासिकल फॉरमॅटमध्ये धक्का देणारा पराभव दिला. गुकेशच्या करियरमध्ये प्रथमच, गुकेशने क्लासिकल टाइम कंट्रोलमध्ये कार्लसनला हरवण्यात यश मिळवले आहे. गुकेशसाठी हा केवळ एक विजय नव्हता, तर करिअरमधील एक महत्त्वाची कामगिरी होती. या निकालासह, स्पर्धेत गुकेश आणि कार्लसन यांच्यातील हेड टू हेड स्कोअर 1-1 असा बरोबरीत आहे.

सुरूवातीत पिछाडी, पण शेवटी जोरदार कमबॅक

चॅम्पियन कार्लसनने सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. मात्र भारताच्या गुकेशने संयम, आत्मविश्वास दाखवत उत्तम बचाव केला. शेवटच्या टप्प्यात कार्लसनने एक चूक केली आणि गुकेशने त्या क्षणी तुच्या चुकीला अगदी अचूक उत्तर देत सामना स्वतःच्या बाजूने वळवला.

हे ही वाचा: आयपीएलप्रमाणे PKL 2025 लिलावात कोटींचा पाऊस! 'हे' आहेत पहिल्या दिवसाचे टॉप 5 महागडे खेळाडू

 

गुकेशने साधला महत्त्वाचा टप्पा

या विजयामुळे गुकेशने कार्लसनविरुद्ध आपला 'हेड टू हेड' स्कोअर 1-1 ने बरोबरीत नेऊन ठेवला आहे. दोघांमधील ही स्पर्धा अधिकच रंजक ठरली. शिवाय गुकेशने अशा खेळाडूविरुद्ध क्लासिकल प्रकारात मिळवलेला हा  विजय, त्याच्या कारकिर्दीत एक मैलाचा दगड ठरली आहे.

हे ही वाचा: डोळ्यात पाणी, चेहऱ्यावर निराशा! मैदानातच हार्दिक, रोहित, नीता अंबानी भावूक; भावनिक Photos Viral

 

कार्लसनला राग अनावर

सामना संपल्यानंतर कार्लसनच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसून आली. त्याने शेवटची मूव्ह करून समाना संतापात टेबलवर मुक्का मारला, ज्यामुळे त्याचे मोहरे खाली पडले. हा पराभव त्याला जोरात लागला आहे हे त्याच्या रिएक्शनमधून दिसून आले. 

हे ही वाचा: क्रिकेटर रिंकूची जीवनसाथी होणारी प्रिया सरोज कोण आहे आणि ती काय करते? जाणून घ्या

 

स्पर्धेचा रंगतदार टप्पा सुरू

राउंड 6 पूर्वी कार्लसन 9.5 गुणांसह अव्वल स्थानी होता, त्याच्यामागोमाग फॅबियानो कारुआना 8 आणि हिकारू नाकामुरा 6.5 गुणांसह होते. मात्र गुकेशच्या या विजयामुळे अंतिम टप्प्यात स्पर्धेचा थरार आणखी वाढला आहे. आता उरलेल्या काही फेऱ्यांमध्ये विजेतेपदासाठी स्पर्धकांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.

Read More