Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर डेल स्टेनने मागितली माफी

स्टेनने केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याची चर्चा

IPL बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर डेल स्टेनने मागितली माफी

मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने पाकिस्तानी माध्यमांना एक निवेदन दिले होते. ज्यामध्ये इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलबाबत त्याने केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याची चर्चा रंगली आहे. आता डेल स्टेन याने याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.

आयपीएलचे 96 सामने खेळणार्‍या डावखुरा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने ट्विटरवर लिहिले आहे की, "आयपीएल माझ्या कारकीर्दीत आश्चर्यकारक गोष्टीपेक्षा कमी नाही. तसेच इतर खेळाडूंसाठी देखील नाही. माझ्या शब्दांचा हेतू कधीही निंदनीय, निंदा करणे किंवा लीगची तुलना करणे नव्हते. यामुळे कुणाला त्रास झाला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. "

क्रिकेट पाकिस्तानने डेल स्टेनचा हवाला देत म्हटले आहे की, "मला काही काळ सुट्टी हवी होती. इतर लीगमध्ये खेळणं थोडं फायदेशीर असतं. आयपीएलमध्ये जातो तिकडे मोठे स्क्वाड आणि नावं असतात. खेळाडूंना किती पैसे दिले जातात यावर अधिक भर दिला जातो. कधी-कधी यामुळे क्रिकेट विसरुन जातो.'

Read More