मुंबई : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने खळबळजनक खुलासा केला आहे. दानिश कनेरिया हिंदू होता म्हणून त्याच्यावर अन्याय झाला. काही खेळाडूंना तर तो आमच्यासोबत का जेवतो? असाही आक्षेप होता, असं वक्तव्य शोएब अख्तरने एका टीव्ही शोदरम्यान केलं आहे.
या गोष्टीवरून माझं दोन-तीन खेळाडूंशी भांडण झालं. जर कोणी हिंदू असेल तर तोपण खेळेल. त्याच हिंदू असलेल्याने आम्हाला टेस्ट सीरिज जिंकवली. तो इकडून जेवण का घेतोय? असा प्रश्न एका खेळाडूने विचारला. तेव्हा तुला इकडून बाहेर फेकून देईन, असं मी त्याला ऐकवलं. कर्णधार असशील तु तुझ्या घरातला. तो तुम्हाला ६-६ विकेट घेऊन देतोय. इंग्लंडमध्ये दानिश आणि शमीने आम्हाला सीरिज जिंकवून दिली होती, असं शोएब अख्तर म्हणाला.
Hindus even at good position like national cricket team are treated badly in Pakistan then think about the poor ones.
— Amit Kumar Sindhi (@AMIT_GUJJU) December 26, 2019
Respect for @shoaib100mph for exposing Pakistan's Hindu hatred pic.twitter.com/IPUTngA0yO
याच कार्यक्रमात राशिद लतीफ यांनी युसुफ योहानाला कसा त्रास देण्यात आला हे सांगितलं. युसुफ योहाना कमालीचा खेळाडू होता, पण त्याला त्रास देण्यात आला. अखेर त्याने धर्म बदलला, असं राशिद लतीफ म्हणाला. युसुफच्या नावावर १२ हजार रन आहेत, पण आपण त्याला योग्य सन्मान दिला नाही, अशी प्रतिक्रिया शोएब अख्तरने दिली. सुरुवातीच्या काळाता युसुफ योहाना या नावानं खेळल्यानंतर युसुफने धर्मांतर केलं आणि मग पुढची कारकिर्द तो मोहम्मद युसुफ या नावाने खेळला.
दानिश कनेरियाला त्याच्या उल्लेखनीय कामगिरीचं श्रेय देण्यात आलं नाही. दानिश कनेरियाला मिळालेली वागणूक चुकीची होती, असं शोएब अख्तरने कबूल केलं आहे.