Deepak Chahar Birthday : भारतीय गोलांफदाज दीपक चहर (Deepak Chahar) 7 ऑगस्ट रोजी त्याचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. दीपक चहरचा जन्म 7 ऑगस्ट 1992 रोजी आग्रा येथे झाला. चहरचे वडील लोकेंद्र सिंह यांनी दीपकला क्रिकेटर होण्यासाठी प्रोत्साहन दिलं. पुढे जाऊन दीपकने भारतीय संघासाठी 13 वनडे आणि 12 टी 20 सामने खेळले आहेत. तर दीपक आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स सारख्या संघात सुद्धा खेळला आहे. 1 जून 2022 रोजी दीपकने त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाज हिच्याशी विवाह केला. पण त्यापूर्वी त्याने आयपीएल सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये केलेलं प्रपोजल हे आजही अनेक क्रिकेट रसिकांच्या लक्षात आहे.
दिल्लीमध्ये लहानाची मोठी झालेली जया भारद्वाज हिने मास कम्युनिकेशनमध्ये डिग्री घेतली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार तिने काही माध्यमांमध्ये काम सुद्धा केलं आहे. जया भारद्वाज आणि दीपक चहरची बहीण मालती या एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. बहीण मालतीनेच जया आणि दीपकची भेट घडवून आणली होती. मग दोघांमध्ये मैत्री झाली आणि दीपक आणि जया एकमेकांच्या प्रेमात पडले. जया बऱ्याचदा टीम इंडिया आणि आयपीएलचे सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये यायची आणि दीपकला चिअर करायची. पण एकदा दीपकने थेट जयाला चालू सामन्यातच प्रपोज करून सरप्राईज दिलं.
दीपकने ऑक्टोबर 2021 मध्ये दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना सुरु असताना गर्लफ्रेंड जयाला प्रपोज केलं होतं. लाईव्ह सामना सुरु असताना दीपक चहर ड्रेसिंग रूममध्ये जाण्याच्या ऐवजी स्टँडच्या दिशेने गेला. स्टॅन्डमध्ये जयासमोर उडघ्यावर बसून दीपकने तिला लग्नाची मागणी घातली. जयाने त्याला होकार दिला. मात्र दीपक लाईव्ह सामन्यात येऊन अशा प्रकारे प्रपोज करेल याची कल्पना जयाला नव्हती त्यामुळे तिला आश्चर्याचा धक्का बसला होता. १८० देशांनी लाईव्ह दीपक आणि मालतीच्या प्रपोजलचा क्षण पाहिला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
Chennai Super Kings (ChennaiIPL) October 7, 2021
हेही वाचा : कोण आहे ज्योती? जिच्या शिक्षणासाठी ऋषभ पंतने उचलला मोठा वाटा, कॉलेजमध्ये घेऊन दिलं ऍडमिशन
चेन्नई सुपरकिंग्सचा कॅप्टन असलेल्या महेंद्रसिंह धोनीने दीपकला प्रपोजल कधी करायचं याची कल्पना दिली होती. दीपकने एका मुलाखतीत सांगितलं की, 'मला जयाला आयपीएल २०२१ च्या फायनल सामन्यात प्रपोज करायचं होतं. पण धोनीने मला सल्ला दिला की याबाबत जास्त विचार करू नकोस आणि प्रपोज करून टाक. प्लेऑफ सामन्यात माझं लक्ष विचलित झालं असत आणि त्याचा फटका कदाचित संघाला बसला असता त्यामुळे धोनीने मला लीग स्टेज सामन्यातच प्रपोज करायला सांगितलं होतं. त्यानंतर फ्रेंचायझी, बीसीसीआय इत्यादींकडून मी याबाबतची परवानगी घेतली आणि पंजाब विरुद्ध सामन्यादरम्यान जयाला प्रयोज करायचं ठरवलं. तो क्षण आम्हाला आयुष्यभरासाठी लक्षात राहील असा होता'.
FAQ :
1. जया भारद्वाज आणि दीपक चहर यांची भेट कशी झाली?
जया भारद्वाज आणि दीपक चहर यांची भेट दीपकची बहीण मालती यांनी घडवून आणली. जया आणि मालती खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.
2. दीपक चहरने जयाला प्रपोज कधी आणि कुठे केले?
दीपक चहरने ऑक्टोबर 2021 मध्ये दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्यादरम्यान जयाला प्रपोज केले.
3. दीपक चहरच्या प्रपोजलची कल्पना कोणी दिली?
चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने दीपकला प्रपोजलची कल्पना दिली आणि लीग स्टेज सामन्यात प्रपोज करण्याचा सल्ला दिला.
4. दीपक चहरच्या प्रपोजलचा क्षण किती देशांनी लाइव्ह पाहिला?
दीपक चहर आणि जया भारद्वाज यांच्या प्रपोजलचा क्षण जवळपास 180 देशांनी लाइव्ह पाहिला.