Delhi Capitals vs Lucknow Super Giants Highlights: इंग्रजीमध्ये Absolute Cinema किंवा Nail Biting Finish म्हणावं असा यंदाच्या इंडियन प्रिमिअर लीगमधील चौथा सामना दिल्लीमध्ये पार पडला. दिल्लीच्या संघाने लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाचा एका विकेटने पराभव केला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो दिल्लीचा अशुतोष शर्मा! 210 धावांचा पाठलाग करताना पहिल्या दीड ओव्हरमध्येच दिल्लीची अवस्था 7 धावांवर 3 बाद अशी होती. मात्र मधल्या फळीतील फलंदाजांनी उत्तम फटकेबाजी करत दिल्लीच्या संघाला पहिला विजय मिळवून दिला. या विजयानंतर बोलताना दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने माझ्या नेतृत्वाखाली संघ अशीच आश्चर्यकारक कामगिरी करताना दिसेल, असं म्हटलं.
दिल्लीच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लखनऊने आक्रमक सुरुवात केली. माकरम आणि मिचेल मार्शने तुफान फटकेबाजी करत 4 ओव्हर पूर्ण होण्याच्या आधीच संघाच्या स्कोअरबोर्डने 40 चा टप्पा ओलांडला. माकरम बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या निकोलस पुरण आणि मिचेल मार्शची जोडी जमली. दोघांनाही यथेच्छ फटकेबाजी केली. 11 ओव्हरमध्ये लखनऊचा स्कोअर 133 वर असताना मार्शच्या रुपात दिल्लीला दुसरं यश मिळालं. 28 कोटी खर्च करुन विकत घेतलेला लखनऊचा कर्णधार ऋषभ पंत भोपळाही न फोडता तंबूत परतला. यानंतर एका क्षणी 230 ते 250 पर्यंत जाईल असं वाटत असताना लखनऊच्या संघाला 8 गड्यांच्या मोबदल्यात 209 धावांपर्यंत मजल मारता आली.
210 धावांचं टार्गेट असताना मैदानात उतरलेल्या दिल्लीची सुरुवातच अडखळत झाली. 1.4 ओव्हरमध्ये दिल्लीची स्थिती 7 वर 3 बाद अशी होती. कर्णधार अक्षर पटेल आणि फॅफ ड्युप्लेसिस या दोघांनी ही गळती थांबवत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षर पटेलही 11 बॉलमध्ये 22 धावा करुन बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या ट्रीस्टॅन स्टब्सने उत्तम फटकेबाजी केली 22 बॉलमध्ये 34 धावा करताना अधिक विकेट्स पडणार नाही याची दोघांनी काळजी घेतली. सहाव्या ओव्हरला ड्युप्लेसिस बाद झाल्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीसाठी आलेल्या अशुतोष शर्माने सामना एक हाती फिरवला. आशुतोषला विपराज निगमची उत्तम साथ मिळाली. मात्र मौक्याच्या क्षणी निगम बाद झाल्यानंतर तळाचे फलंदाज गोंधळून जात असतानाच अशुतोषने आपला संयम कायम राखला.
अखेरच्या ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवर पंतने स्टॅम्पिंगची संधी वाया घालवली. मोहित शर्माने पुढच्या चेंडूवर एक धाव काढत विजयासाठी चार धावा हव्या असताना आशुतोषने खणखणीत षटकार लगावत विजयावर शिक्कामोर्तब केलं.
And he does it in
— IndianPremierLeague (@IPL) March 24, 2025
Ashutosh Sharma, take a bow!
A #TATAIPL classic in Vizag
Updates https://t.co/aHUCFODDQL#DCvLSG | @DelhiCapitals pic.twitter.com/rVAfJMqfm7
अशुतोष शर्माने 31 बॉलमध्ये नाबाद 66 धावा केल्या. यामध्ये पाच चौकार आणि पाच षटकारांचा समावेश आहे. 3 चेंडू आणि एक विकेट राखून दिल्लीने हा सामना जिंकला.