Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'धनश्री प्रत्येक भांडणानंतर डायमंड मागायची अन्...' Yuzvendra Chahal ने सगळं सांगून टाकलं; व्हायरल झाला व्हिडीओ

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची चर्चा होत असताना आणखी एक गोष्ट समोर आली आहे. यामध्ये धनश्री वर्मा प्रत्येक भांडणानंतर त्याच्याकडे डायमंडची मागणी करत असल्याच सांगितलं जात आहे. 

'धनश्री प्रत्येक भांडणानंतर डायमंड मागायची अन्...' Yuzvendra Chahal ने सगळं सांगून टाकलं; व्हायरल झाला व्हिडीओ

भारतीय क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि कोरियोग्राफर धनश्री वर्मा हे दोघं सध्या घटस्फोटामुळे चर्चेत आले आहेत.  दोघांनी अद्यापही याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र त्यांच्या क्रिप्टिक पोस्टमुळे या चर्चांना आणखी उधाण आलं आहे. या दरम्यान धनश्री वर्मा प्रत्येक भांडणानंतर युझवेंद्रकडे डायमंडची मागणी करायची अशी देखील चर्चा आता रंगली आहे. 

वायरल झाला तो व्हिडीओ 

या दरम्यान युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आगे. ज्यामध्ये धनश्रीला सपोर्ट कराला युझवेंद्र चहल आला होता. या कार्यक्रमात धनश्री प्रत्येक भांडणानंतर गिफ्ट स्वरुपात त्याच्याकडून डायमंड मागत असल्याच सांगण्यात आलं. 

भांडणानंतर डायमंड मागायची 

शोचा होस्ट रित्विक धनजानी आणि गौहर खान या दोघांसोबत दम शराद सारखा खेळ खेळतात. या खेळात धनश्रीला एक बोर्ड धरावा लागला ज्यावर एक शब्द लिहिलेला होता. युजी या शब्दाचं वर्णन एका शब्दात करतो. त्यानंतर समोरच्या व्यक्तीला 10 सेकंदात तो शब्द अंदाज लावावा लागेल. यादरम्यान, धनश्री एक एक करून फलक दाखवते. एका फलकावर डायमंड हा शब्द लिहिलेला होता. यावर चहल धनश्रीला म्हणतो, "भांडणानंतर तू माझ्याकडून काय मागतेस." धनश्री म्हणते, "काय? माफ करा." पण धनश्रीचा हा अंदाज चुकतो. तेव्हा चहल सांगतो की, प्रत्येक भांडणानंतर तू डायमंड मागतेस. 

चहलने दिलं स्पष्टीकरण

खरंतर हे सर्व विनोद म्हणून सांगितले गेले होते आणि धनश्रीलाही डायमंड मागितल्याचा उल्लेख ऐकून आश्चर्य वाटले. ती चहलला विचारते की तिने हिरा कधी मागितला? चहलने नंतर स्पष्ट केले की धनश्रीने प्रत्यक्षात हिरे मागितले नव्हते, ते फक्त एक विनोद होता. मात्र आता त्याचे चाहते या व्हिडिओला त्याच्या वैवाहिक आयुष्याशी जोडत आहेत.

2020 मध्ये केलं लग्न 

डेन्टिस्ट असलेली कोरिओग्राफर धनश्रीने डिसेंबर 2020 मध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू युजवेंद्र चहलशी लग्न केले. दोघांमधील नाते खूप चांगले चालले होते पण काही काळापासून सोशल मीडियावर त्यांच्या वेगळे होण्याच्या अफवा येऊ लागल्या. आता बातमी अशी आहे की त्यांचा घटस्फोट झाला आहे.

Read More