Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

धोनीने त्याच्या बाईकसोबत केली हरभजनची तुलना

पाहा का बोलला धोनी असं...

धोनीने त्याच्या बाईकसोबत केली हरभजनची तुलना

मुंबई : आयपीएल सीजन 11 चा फायनल सामना थोड्याच वेळात मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर रंगणार आहे. चेन्नई आणि हैदराबाद दोन्ही टीम यासाठी सज्ज झाल्या आहेत. याआधी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी फायनलसाठी केलेली तयारी बाबत मीडियासमोर चर्चा केली. या दरम्यान जेव्हा धोनीला हरभजनबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने त्याची तुलना त्याच्या बाईकसोबत केली. धोनीच्या या उत्तराने अनेकांना धक्का बसला.

महेंद्र सिंह धोनीला जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला की प्लेईंग इलेवनमध्ये असतांना देखील हरभजनला एकही ओव्हर का देण्यात आली नाही. तेव्हा धोनीने म्हटलं की, तुम्हाला माहित आहे की, माझा घरी अनेक कार आणि बाईक आहेत. पण मी त्या एकत्र नाही चालवू शकत. अशी देखील वेळ येते जेव्हा तुमच्या संघात 6-7 बॉलर असतात पण तुम्हाला परिस्थितीनुसार चालावं लागतं. कोण बॅटींग करतंय त्याप्रमाणे बॉलर असला पाहिजे. मला नाही वाटलं की तेव्हा हरभजनला बॉलिंग दिली पाहिजे होती.''

धोनीने म्हटलं की, ''अनुभव मॅटर करतो. पण तो नेहमीच मॅटर नाही करत. ही अशी गोष्ट आहे. ज्याला रिप्लेस नाही केलं जावू शकत. चांगली गोष्टी ही आहे की आम्ही व्यवस्थित मॅनेज केलं.' स्पिनर हरभजन सिंगने आयपीएलमध्ये 149 सामने खेळले आहेत पण असं तिसऱ्यांदा झालं जेव्हा त्याला एकही ओव्हर देण्यात आली नाही.

Read More