सिमला : भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी बायको साक्षी आणि मुलगी जीवासोबत सिमल्यामध्ये आहे. सिमल्यात धोनी रस्त्यावर बुलेट फिरवताना दिसला. धोनीला हिमाचल प्रदेश सरकारनं राज्य अतिथीचा दर्जा दिला आहे. धोनी सिमल्यामध्ये क्रिकेट स्पर्धा खेळायला नाही तर वैयक्तिक कारणासाठी आला आहे. सिमल्यामध्ये धोनी एका जाहिरातीचं शूटिंग करत आहे. यावेळी धोनी ब्राऊन रंगाचं जॅकेट घालून बुलेट चालवताना दिसला.
@msdhoni enjoys riding in Shimla, en route to the shoot location.#msd #mahi #thala pic.twitter.com/zfztpCeKLk
— Rhiti Sports (@RhitiSports) August 28, 2018
महेंद्रसिंग धोनी चार्टर प्लेननं हिमाचलमध्ये आला आहे. धोनीला आणि त्याचं कुटुंब फाईव्ह स्टार हॉटेल वाईल्ड फ्लॉवरमध्ये राहत आहे. धोनी सिमल्यामध्ये ५ दिवस राहणार आहे. ३१ ऑगस्टला तो पुन्हा घरी परतेल.
हिमाचल प्रदेशचा अतिथी झाल्यामुळे धोनीला मोठी सुरक्षा देण्यात आली आहे. शूटिंगवेळीही धोनीला एस्कॉर्ट वाहनं देण्यात आली आहेत. धोनीला विशेष अतिथीचा दर्जा देण्यात आल्यामुळे काँग्रेसनं राज्याच्या भाजप सरकारवर टीका केली आहे. धोनी जाहिरातीच्या शूटिंगसाठी आलेला असताना त्याला विशेष अतिथीचा दर्जा का असा सवाल काँग्रेसनं विचारला आहे. क्रिकेट खेळाडूंनाच हा दर्जा का दिला जातो? अन्य खेळाडूंनाही असाच दर्जा देण्यात यावा अशी मागणी राज्यातल्या काँग्रेसनं केली आहे.
Latest photo of @msdhoni at Simla.
— Odisha Msdians Club (@ClubMsdians) August 28, 2018
Bike Lover pic.twitter.com/yGXhFTQF1T
१५ सप्टेंबरपासून युएईमध्ये आशिया कपला सुरुवात होणार आहे. त्याआधी धोनी हिमाचलमध्ये कुटुंबासोबत सुट्टी एन्जॉय करतोय. १७ जुलैला इंग्लंडविरुद्धची वनडे सीरिज संपल्यानंतर धोनी भारतामध्ये परत आला.