Anushka Sharma Sharma's Sister : सध्या सोशल मीडियावर एक नवा ट्रेंड सुरु आहे ज्यात लोकं त्यांच्या लोकप्रिय असलेल्या नातेवाईकांविषयी बोलत आहेत. या ट्रेंडचं नाव holyfknairball असं आहे. या ट्रेंडमध्ये अनेकांनी दावा केला की बॉलिवूडचे लोकप्रिय सेलिब्रिटी हे त्यांचे नातेवाईक आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या एका नातेवाईकानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. खरंतर, तनु शर्मा असं नाव असलेल्या डिजिटल क्रिएटरनं दावा केला आहे की ती अनुष्का शर्माच्या कुटुंबातून आहे. आता लोकं कमेंट करत मजेशीर गोष्टी लिहत आहेत.
तनु शर्मा असं या डिजिटल क्रिएटरचं नाव आहे. तनु शर्मानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट तिनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून केली आहे. यात तिनं तिचा फोटो लावून लिहिलं की मी कलाकारांच्या कुटुंबातून आहे. मग लोकांकडून प्रश्न लिहिण्यात आला की तुमच्या कुटुंबात कोणी सहकलाकाराची भूमिका साकारणारं आहे का? तर त्याचं उत्तर देत तिनं अनुष्का शर्माचा फोटो दाखवला. त्यासोबत या ट्रेंडमध्ये तिनं #holyfknairball असं नाव देखील लिहिलं. आता तनुच्या कमेंट सेक्शनमध्ये लोक तिच्याकडे विविध मागण्या करत आहेत.
तनुनं शेअर केलेल्या या पोस्टवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'विराट भाईचा नंबर देना.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तिचा भावोजी विराट कोहली आहे.' तिसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'मग तर विराट माझा देखील भावोजी झाला.' इतकंच नाही तर अनेक नेटकऱ्यांनी तनु शर्मा आडनावामुळे असं सगळ्यांना मिसलीड करते आणि फक्त फॉलोवर्स वाढवण्यासाठी करते. एक नेटकरी तर म्हणाला, 'अनुष्का शर्मा तुला फॉलो पण नाही करत.' दुसरा म्हणाला, 'मग तर तू रोहित शर्माची देखील नातेवाई असशील?'
हेही वाचा : हिंदू बायको तरी मुलांची नाव इरा, जुनैद आणि आजाद का? आमिर खाननं सांगितलं कारण
दरम्यान, सोशल मीडियावर तनू विषयी आता नेटकरी वेगवेगळ्या गोष्टी शोधत आहेत. कोणी तिचं शिक्षण कुठून झालं तर ती खरंच अनुष्का शर्माची नातेवाईक आहे का यावर चर्चा करत आहेत. दुसरीकडे तनुच्या इन्स्टाग्राम अकाऊंटविषयी बोलायचं झालं तर तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 489 फॉलोवर्स आहेत. तर तिनं स्वत: ला डिजीटल क्रिएटर अशी ओळख दिली आहे.