LSG VS KKR : मंगळवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात लखनऊने केकेआरवर 4 धावांनी विजय मिळवला. लखनऊने केकेआरला विजयासाठी 239 धावांचे आव्हान दिले होते. मात्र हे आव्हान पूर्ण करताना केकेआरचा स्टार फलंदाज सुनील नरेन हा फक्त 30 धावा करून बाद झाला. त्याची विकेट दिग्वेश राठीने घेतली. दिग्वेश राठी हा आयपीएल 2025 मध्ये त्याच्या नोटबुक सेलिब्रेशनसाठी लोकप्रिय आहे. यासाठी त्याला बीसीसीआयने दोनवेळा दंड सुद्धा केलाय. दिग्वेशने यावेळी केकेआरच्या फलंदाजाला बाद केल्यावर त्याची सेलिब्रेट करण्याची स्टाईल बदलली आणि तो जमिनीवर काहीतरी लिहिताना दिसून आला.
फलंदाजांची विकेट काढल्यावर गोलंदाज दिग्वेश राठीचं नोटबुक सेलिब्रशन मागील काही दिवसांपासून चर्चेत होतं. या सेलिब्रेशन स्टाईलवर आक्षेप घेऊन त्याच्यावर बीसीसीआयने दोनदा दंडात्मक कारवाई सुद्धा केली आहे. जेव्हा मंगळवारी केकेआरचा फलंदाज सुनील नरेनला आउट केलं तेव्हा दिग्वेश जमिनीवर काहीतरी लिहिताना दिसला आणि खूपच आनंदी दिसत होता. मागील दोन सामन्यात गोलंदाज दिग्वेश राठी हा विकेट घेतल्यावर हातावर काहीतरी लिहिताना दिसायचा. दिग्वेश राठी याला लखनऊने 30 लाख रूपयांना विकत घेतले.
दिग्वेश राठीने आयपीएल 2025 मधील लागोपाठ दोन सामन्यात नोटबुक सेलिब्रेशन केल्याने बीसीसीआयने त्याच्याकडून 5.60 लाख रुपयांचा दंड आकारला आहे. त्याच्यावर आयपीएलच्या आचार संहितेचं उल्लंघन केल्याने हा दंड आकारण्यात आला होता. तर दुसऱ्या सामन्यात राठीने पुन्हा एकदा हीच चूक केल्याने 50 टक्के दंड लगावला. या प्रकारे युवा गोलंदाजाला 3.75 लाखांचं नुकसान झालं. पहिल्या सामन्यात त्यांच्यावर 25 टक्के दंड आकारण्यात आला होता.
Mufaddal Vohra (mufaddalvohra) April 8, 2025
The notebook celebration, this time on the ground. pic.twitter.com/rmbY8InNEA
हेही वाचा : केदार जाधवची राजकारणात एंट्री! माजी क्रिकेटरची संपत्ती आणि कार कलेक्शन पाहून डोळे फिरतील
लखनऊ सुपर जाएंट्सचा गोलंदाज दिग्वेश सिंह राठी याच्यावर पहिल्याच सामन्यात आयपीएलच्या आचार संहितेचं उल्लंघन केल्याने मोठा दंड लावण्यात आला होता. लखनऊच्या एकना स्टेडियमवर पंजाब किंग्सच्या फलंदाजाला बाद केल्यावर प्रियांश आर्यला आउट केल्यानंतर त्याला धक्का देत नोटबुक सेलिब्रेशन केले होते. यानंतर त्याच्यावर 25 टक्के दंड लावण्यात आला, यासोबतच त्याच्या खात्यात एक डिमेरीट पॉईंट सुद्धा जोडण्यात आला.