LSG vs PBKS: आयपीएल 2025 च्या 13 व्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातएकाना स्टेडियमवर हा सामना पार पडला. या सामन्यात दिल्लीच्या दोन मुलांमध्ये लढत बघायला मिळाली. दिल्लीतील ही मुले म्हणजे प्रियांश आर्य आणि दिग्वेश राठी. लखनौचा लेगस्पिनर दिग्वेशने तिसऱ्याच षटकात प्रशांत आर्यला बाद करताच एका खास पद्धतीने सेलिब्रेशन केले (Digvesh Rathi Notebook Style Celebration) . हे सेलिब्रेशनने विराट कोहली आणि केसरिक विल्यम्स यांच्यातील लढतीची आठवण झाली. याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
दिग्वेशने आपल्या दमदार गोलंदाजीने प्रियांशला आउट केलं. प्रियांशने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू हवेत गेला आणि शार्दुल ठाकूरने अगदी सहज झेल घेतला. यानंतर दिग्वेश आपल्या टीम मेंट्ससोबत सेलिब्रेशन करण्याऐवजी प्रियांशकडे धावत जातो. धावत जाऊन हातात काहीतरी लिहिण्याची अॅक्शन करताना दिसला. दिग्वेशचे हे नोटबुक सेलिब्रेशन बघून प्रियांशने त्याला उत्तरही दिले नाही. दिल्ली प्रीमियर लीगच्या वेळेपासून दोन्ही खेळाडू एकमेकांना ट्रोल करत आहेत.
हे ही वाचा: 'या' प्रसिद्ध खेळाडूच्या प्रेमात पडली ट्रम्पची सून! व्हायरल फोटोंमुळे उडाली खळबळ
#DigveshRathi provides the breakthrough as #PriyanshArya heads back!
— Star Sports (@StarSportsIndia) April 1, 2025
P.S: Don't miss the celebration at the end!
Watch LIVE action of #LSGvPBKS https://t.co/GLxHRDQajv#IPLOnJiostar | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi & JioHotstar! | #IndianPossibleLeague pic.twitter.com/TAhHDtXX8n
दिग्वेशच्या सेलिब्रेशनला बघून विराट कोहलीची आठवण झाली. खरतर 2017 मध्ये वेस्ट इंडिजच्या केसरिक विल्यम्सने विराट कोहलीला बाद केल्यानंतर दिग्वेशप्रमाणेच सेलिब्रेशन केले होते. विराट कोहलीला बाद केल्यानंतर त्याने हातावर काहीतरी लिहिण्याची अॅक्शन करतो. जणू तो विराटला बाद केल्यानंतर त्याच्या वहीत त्याचे नाव नोंदवत आहे अशी ती अॅक्शन होती.
हे ही वाचा: लाइव्ह मॅचमध्ये युझवेंद्र चहलने केली शिवीगाळ, विकेट घेतल्यावर दिली आक्रामक रिअॅक्शन; Video Viral
दोन वर्षांनंतर, 2019 मध्ये, विराट कोहलीने हैदराबाद एकदिवसीय सामन्यात केसरिक विल्यम्सच्या चेंडूवर जबरदस्त फटकेबाजी केली. यावेळी विराटने त्याच्या खेळाची दखल घेण्यासाठी नोटबुक सेलिब्रेशन केली. विराट आणि केसरिक विल्यम्स यांच्यातील ही लढत खूप चर्चेत होती.
हे ही वाचा: MS Dhoni: धोनी आयपीएलला तात्काळ अलविदा करणार? Viral पोस्टमुळे आलं चर्चेला उधाण
पंजाब किंग्जचा सलामीवीर प्रियांश आर्यला बाद केल्यानंतर आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दिग्वेश राठीला त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे आणि एक डिमेरिट पॉइंट (Digvesh Rathi Receives Fine & Demerit Points)देखील जमा केला आहे.