Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

10 वर्षानंतर टेस्टमध्ये या खेळाडुला मिळाली संधी

10 वर्षानंतर टेस्टमध्ये आगमन

10 वर्षानंतर टेस्टमध्ये या खेळाडुला मिळाली संधी

बर्मिंघम: इंग्लंड विरुद्ध प्रभावी खेळी करणारा आणि 10 वर्षानंतर त्याच टीम विरोधात टेस्ट सीरीज खेळण्याची संधी दिनेश कार्तिकला मिळाली आहे. दिनेश कार्तिक नर्व्हस असल्याचं तो म्हणतोय. कार्तिकने जूनमध्ये अफगानिस्तानच्या विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये वारसी केली होती. भारताचा टेस्ट विकेटकीपर ऋद्धिमान साहा खांद्याला दुखापत झाल्यामुळे टीममधून बाहेर आहे. यामुळे दिनेश कार्तिकला संधी मिळाली आहे.

इंग्लंडमध्ये 2007 मध्ये झालेल्य़ा सीरीजमध्ये कार्तिकने लॉर्डसवर 60, ट्रेंट ब्रिजमध्ये 77 आणि ओवलमध्ये 91 रन केले होते. कार्तिकने म्हटलं की, "मी नर्व्हस आहे आणि थोडा रोमांच देखील आहे. बराच काळानंतर टेस्ट क्रिकेट खेळणार आहे. इंग्लंडमध्ये खेळणं आव्हानात्मक आहे पण इतर खेळाडूंप्रमाणे मी पण उत्साहीत आहे.

राहुल द्रविड कर्णधार असताना टेस्ट सीरीज जिंकणाऱ्या भारतीय टीममधला फक्त कार्तिक आताच्या टीममध्ये खेळणार आहे. त्याने म्हटलं की, "मला मागचं इतकं लक्षात नाही राहत. मला इतकं आठवतं की माझी कामगिरी चांगली होती. त्या सिरीजमध्ये 3 ही सामन्यात दोन्ही संघाने काहीही बदल न करता टीम मैदानात उतरवली होती.

Read More