Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

११ वर्षात दिनेश कार्तिकला केवळ १९ मॅच खेळायला मिळाल्या

निधहास ट्रॉफीमध्ये बांगलादेशला टीम इंडियाने नाही तर दिनेश कार्तिकने हरवलयं.

११ वर्षात  दिनेश कार्तिकला केवळ १९ मॅच खेळायला मिळाल्या

मुंबई : निधहास ट्रॉफीमध्ये बांगलादेशला टीम इंडियाने नाही तर दिनेश कार्तिकने हरवलयं.

त्याच्या बॅटींगच कौतूक करायला सर्व क्रिकेटप्रेमींना शब्द अपूरे पडतायत. दिनेश कार्तिक ११ वर्षांपासून टीम इंडियाशी जोडला गेलाय तरीही त्याच्या वाट्याला खूप कमी मॅच आल्या आहेत.

केकेआरचा कॅप्टन 

टीम इंडियाच्या पहिल्या टी २० मॅचचा तो 'मॅन ऑफ द मॅच' ठरला. जर त्याच्या चांगल्या परफॉर्मन्समध्ये सातत्य राहिल असत तर महेंद्रसिंग धोनीच्या एन्ट्रीमध्ये अडचणी आल्या असत्या असं म्हटलं जातं.

शाहरूख खानच्या आयपीएल टीम कोलकाता नाईट रायडरने त्याला कॅप्टन बनवलय.  

केवळ १९ मॅच खेळला    

दिनेश कार्तिकला ११ वर्षात केवळ १९ मॅच खेळला आहे. हा आकडा खरच धक्कादायक आहे.

आपण बोलतोय टी २० क्रिकेट मॅचबद्दल. टीम इंडियाच्या टी २० टीममध्ये केवळ १९ मॅच खेळलाय. 

Read More