What Do Players eat at lunch breaks: क्रिकेट सामना सुरु असताना वेगवगेळ्या प्रकारचे ब्रेक होतात. त्यातील एक म्हणजे टी ब्रेक. क्रिकेटचा सामना सुरु असताना अनेकांना उत्सुकता असते की, खेळाडू ड्रिंक्स ब्रेकमध्ये नेमकं काय पीतात? लंच ब्रेकला काय खातात? आणि 'टी ब्रेक'मध्ये खरंच चहा घेतात का? इंग्लंडचा फलंदाज ओली पोपने याच प्रश्नांची दिली आहे थेट उत्तरं दिली आहेत. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावून आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेणाऱ्या 27 वर्षीय ओली पोपने नुकतीच स्काय स्पोर्ट्सला मुलाखत दिली. त्यामध्ये त्याने आपल्या फिटनेस रूटीनसोबतच मैदानातल्या ब्रेक टाइम डाएटबद्दल खुलेपणाने सांगितलं आहे.
ओली पोप म्हणतो, "लंच ब्रेकमध्ये मी सामान्यतः चिकन, मासे किंवा पास्ता खातो. कारण यावेळी शरीराला उर्जा लागते." तो पुढे सांगतो, "पण परिस्थितीनुसार मी काय खातो हे बदलतं. मी फलंदाजी करत असेन तर फारसं खात नाही. त्या वेळी प्रोटीन शेक आणि एक केळं एवढंच घेतो."
ओली पोप सांगतो की जर दिवसभर फलंदाजी सुरू असेल, तर संध्याकाळी काही खाण्याची इच्छाच उरत नाही. “त्या क्षणी फक्त उरलेली थोडी उर्जा मिळावी म्हणून काहीतरी हलकं खातो. ” असं त्याचं म्हणणं आहे.
"टी ब्रेकमध्ये खरंच चहा घेतात का?" या प्रश्नावर ओली पोप म्हणतो, "हो, काही खेळाडू चहा घेतात. पण मी सहसा कॉफी घेतो. आणि जर पाऊस पडून सामना थांबलेला असेल, तर मग मी कधीकधी एक कप चहा घेतो."
ओली पोप स्पष्टपणे सांगतो की, ब्रेकदरम्यान नेमकं काय खायचं किंवा प्यायचं याचं ठराविक मेनू नसतो. प्रत्येक खेळाडू आपल्या गरजेनुसार निर्णय घेतो. पण एक गोष्ट नक्की की, डिहायड्रेशन टाळण्यासाठी प्रत्येक ब्रेकमध्ये काहीतरी घ्यावं लागतं, म्हणूनच बहुतेक खेळाडू एनर्जी ड्रिंक्स किंवा इलेक्ट्रोलाइट्स घ्यायला प्राधान्य देतात.
What do you do if you need the toilet during an innings?
— Sky Sports Cricket (@SkyCricket) July 19, 2025
Ollie Pope answering the important questions pic.twitter.com/4yTy5wtA5f
मैदानावरच्या घामगळीत आणि तणावात फॉर्म राखायचा असेल, तर ब्रेकमध्ये काय खायचं-प्यायचं हे खेळाडूंनी काटेकोरपणे ठरवलेलं असतं. ओली पोपच्या या या खुलाशामुळे आता चाहत्यांना खेळाडूंच्या त्या 'ब्रेक' मागचं खरं चित्र कळलं आहे.