Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

तुला गुजराती समजतं का? IPL मधल्या रोबोट डॉगची अक्षर पटेलने घेतली फिरकी; Video व्हायरल

IPL 2025 : सध्या या रॉबोटिक डॉग सोबत विविध स्टार खेळाडूंचा झालेला सामना सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काही दिवसांपूर्वी एम एस धोनीला  सुद्धा या रॉबोटिक डॉगचे कुतुहूल वाटले. आता अक्षर पटेलने रॉबोटिक डॉगचा सोबत साधलेल्या संवादाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

तुला गुजराती समजतं का? IPL मधल्या रोबोट डॉगची अक्षर पटेलने घेतली फिरकी; Video व्हायरल

IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये (घझथ 2025) सध्या खेळाडू आणि सामन्यानंतर नव्याने सहभागी झालेल्या रोबोट डॉगची विशेष चर्चा आहे. कुत्र्याच्या आकाराचा, टॉसवेळी दिसणारा, मैदानात खेळाडुंसोबत दिसणारा हा रॉबोटिक डॉग तंत्रज्ञानाचा वेगळा अविष्कार आहे. सध्या या रॉबोटिक डॉग सोबत विविध स्टार खेळाडूंचा झालेला सामना सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काही दिवसांपूर्वी एम एस धोनीला (MS Dhoni) सुद्धा या रॉबोटिक डॉगचे कुतुहूल वाटले. आता अक्षर पटेलने (Axar Patel) रॉबोटिक डॉगचा सोबत साधलेल्या संवादाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ सध्या पॉईंट्स टेबलमध्ये 7 पैकी 5 सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे. दिल्लीचा संघ त्यांचे होम ग्राउंड असलेल्या अरुण जेटली स्टेडियमवर प्रॅक्टिस करत असताना रॉबोटिक डॉग मैदानात खेळाडूंना भेटण्यासाठी आला. त्याला पाहताच अनेक खेळाडू तर आश्चर्यचकित झाले. काहींनी त्याच्याशी संवाद साधला. यावेळी अक्षर पटेलने रोबोट डॉगची चांगलीच फिरकी घेतली. 

हेही वाचा : Video : चांगला खेळलास म्हात्रे! MI VS CSK मॅचनंतर रोहित शर्माने 17 वर्षांच्या फलंदाजाला दिली शाबासकी

 

आयपीएलमधील रोबोट डॉगला पाहून सर्वच आश्चर्यचकित होत होते. असे असताना दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल हा मैदानात आला आणि त्याने रोबोट डॉगची करामत पाहिली. त्याने समीर रिझवीला बोलवलं आणि तो म्हणाला हा रोबोट डॉग जॅपनीज आहे. मग त्याने रोबोट डॉगला 'हाय' बोलायला सांगितलं. पुढे अक्षर रोबोट डॉगला म्हणाला, 'तुला गुजराती समजत का? तू काय करतोयस. तुला मजा येतेय का?'.  

पाहा व्हिडीओ : 

आयपीएल रोबोट डॉग काय करू शकतो?

आयपीएल रोबोट डॉग धावू शकतो, उडी मारू शकतो, आवाज समजू शकतो आणि प्रतिसाद देऊ शकतो आणि त्याच्या पुढच्या पायांनी लव आकारही बनवू शकतो. यामुळे एक अनोखा डॉग-आय व्ह्यू मिळतो. क्रिकेट फॅन्ससाठी सामना आणखी रोमांचकारी होतो. आयपीएल रोबोट डॉग अमेरिकन कंपनी बोस्टन डायनॅमिक्सच्या चार पायांच्या रोबोट्सपासून प्रेरित असल्याचे सांगण्यात येते. अशा रोबोट्सचा वापर लष्करी साहित्य वाहून नेण्यापासून ते धोकादायक ठिकाणांची तपासणी करण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी केला जातो. आयपीएलचा हा रोबोट कुत्रा लहान आणि खूप मजेदार आहे.

Read More