Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

PICS: एअरपोर्टनंतर आता येथेही एली दिसली हार्दिकसोबत

बॉलीवूड आणि क्रिकेटर यांचे नाते खूप जुने आहे. यातील काही लव्हस्टोरी यशस्वी झाल्यात तर काही लव्हस्टोरी केवळ चर्चेपुरत्याच मर्यादित राहिल्या.

PICS: एअरपोर्टनंतर आता येथेही एली दिसली हार्दिकसोबत

मुंबई : बॉलीवूड आणि क्रिकेटर यांचे नाते खूप जुने आहे. यातील काही लव्हस्टोरी यशस्वी झाल्यात तर काही लव्हस्टोरी केवळ चर्चेपुरत्याच मर्यादित राहिल्या.

गेल्या वर्षी अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खान त्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा विवाहबंधनात अडकले. यानंतर आता क्रिकेट आणि बॉलीवूडला जोडणारी आणखी एक लव्हस्टोरी समोर आलीये. क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री एली अवराम दोघांना अनेकदा एकत्र पाहिले गेले. याआधी हार्दिकच्या भावाच्या लग्नात त्यानतर एअरपोर्टवर. 

बॉलीवूडमध्ये मिक्की व्हायरस या सिनेमातून पदार्पण करणारी एली अवराम हार्दिक पांड्यासह अॅड शूटदरम्यान दिसली. येथे शूट करण्यासाठी हार्दिक आला होता. त्यावेळी एलीही तिथे होती. 

 

जेव्हा एली अवराम हार्दिकच्या भावाच्या लग्नात आली तेव्हा हार्दिक आणि एलीच्या लव्हस्टोरीच्या चर्चांना ऊत आला होता. त्यानंतर हार्दिक पांड्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला असताना तेथेही एली दिसली होती. 

Read More