Royal Challengers Bangalore vs UP Warriorz : वुमन्स प्रीमिअर लीगमधील 11 वा सामना युपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात आरसीबीच्या पोरींनी बाजी मारली. स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि एलिस पेरी (Ellyse Perry) यांच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर आरसीबीने 198 धावांचं आव्हान उभं केलं होतं. सांगलीच्या स्मृती मानधनाने 80 धावांची खेळी केली तर पेरीने 58 धावा केल्या आहेत. त्याला प्रत्युत्तर देताना युपीला 175 धावाच करता आल्या. अशातच या सामन्यातील एलिस पेरीने डेमो कारची काच (Elysse Perry breaks window) फोडल्याचं समोर आलंय.
नेमकं काय झालं?
स्मृती मानधना आपलं काम करून डगआऊटमध्ये परतली. स्मृती मानधनाने 50 बॉलमध्ये 80 धावांची खेळी केली. स्मृती मानधना बाद झाल्यानंतर पेरीने आतिषबाजी सुरू केली. 19 व्या ओव्हरमध्ये जेव्हा दिप्ती शर्मा गोलंदाजीला होती, तेव्हा पेरीने पुढे येऊन खणखणीत सिक्स मारला. पेरीने मारलेला हा बॉल थेट डगआऊटशेजारी उभ्या असलेल्या गाडीला जाऊन लागला. त्यावेळी त्या गाडीची काच देखील फुटली. गाडीची काच फुटल्याचं पाहून खेळाडू देखील शॉक झाले.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 4, 2024
- The reaction of Perry was priceless!! pic.twitter.com/zaxiQLLN1r
दरम्यान, 199 धावांचं आव्हान पार करताना युपीची कॅप्टन ॲलिसा हिली हिने 38 बॉलमध्ये 55 धावांची खेळी केली. तर त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला मैदानात टिकता आलं नाही. दिप्ती शर्माने डाव सावरला खरा पण पूनम खेमनारसह ती देखील अपयशी ठरली. अखेर युपीला फक्त 20 ओव्हरमध्ये 175 धावांवर समाधान मानावं लागलं.
यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन) : ॲलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), किरण नवगिरे, चमारी अथापथू, ग्रेस हॅरिस, श्वेता सेहरावत, दीप्ती शर्मा, पूनम खेमनार, सोफी एक्लेस्टोन, राजेश्वरी गायकवाड, सायमा ठाकोर, अंजली सरवानी.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन) : स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, एकता बिश्त, सिमरन बहादूर, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग.