Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

गर्लफ्रेंडशी ब्रेकअपचा 'राग' त्याने इंडियन बॅट्समनवर काढला

दोन डावांमध्ये ब्रॉडमध्ये झालेल्या बदलाला एक कारण असल्याचे म्हटले जाते.

गर्लफ्रेंडशी ब्रेकअपचा 'राग' त्याने इंडियन बॅट्समनवर काढला

नवी दिल्ली : एखाद्याला राग जेव्हा अनावर होतो तेव्हा तो काय करेल हे नक्की सांगता येत नाही. लॉर्ड्सच्या मैदानात एका बॉलरच्या रागाचा फुगा भारतीय बॅट्समन्सवर फुटला आणि भारताला हार पत्करावी लागली. इंग्लंडने टीम इंडियाला १५९ रन्सने हरविले. इंग्लंडच्या या विजयाचे अनेक शिल्पकार ठरले पण दुसऱ्या डावात भारताच्या मिडल ऑर्डरच कंबरड मोडणारा स्टुअर्ड ब्रॉड ठरला. ब्रॉडला पहिल्या डावात केवळ एकच विकेट मिळाली. दुसऱ्या डावात मिडल ऑर्डरचे चार विकेट मिळाली. दोन डावांमध्ये ब्रॉडमध्ये झालेल्या बदलाला एक कारण असल्याचे म्हटले जाते.

टीम इंडियावर राग  

लॉर्ड्स टेस्टच्या तिसऱ्या दिवशी स्टुअर्ट ब्रॉड आणि त्याची गर्लफ्रेंड मॉली किंगच ब्रेकअप झालं. तो आपल्या गर्लफ्रेंडसाठी वेळ देऊ शकत नव्हता हे त्याच्या ब्रेकअपमागचं कारण होतं असं म्हटलं जातंय. यासाठी कुठे ना कुठे क्रिकेटही कारणीभूत होतं.  आता क्रिकेटमूळे त्याला प्रेमात ठोकर मिळाली मग राग तर निघणारच होता. याचा परिणाम टीम इंडियाला भोगावा लागला अशी चर्चा आहे. 

केला नवा रेकॉर्ड 

लॉर्ड टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ब्रॉडने १६ ओव्हरमध्ये ४४ रन्स देऊन भारताचे ४ विकेट घेतले. यामध्ये पुजारा, रहाणे, विराट आणि दिनेश कार्तिकसारखे दिग्गज बॅट्समन होते. यासोबतच त्याचे टेस्ट क्रिकेटमधील ४२४ विकेट पूर्ण झाले. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलर्सच्या टॉप १० यादीत तो पोहोचलाय. एवढंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजिंक्य राहणेला सर्वाधिक ८ वेळा आऊट करणारा बॉलर ठरला.

Read More