India vs England: अँडरसन-तेंडुलकर मालिकेचा निकाल ठरवणारा अखेरचा सामना 31 जुलैपासून खेळला जाणार आहे. गुरुवारपासून ओव्हलमध्ये होणाऱ्या या सामन्याआधी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार बेन स्टोक्स हा सामना खेळणार नसल्याचं बोर्डाकडून जाहीर करण्यात आलं आहे. खांद्याला दुखापत झाल्याने बेन स्टोक्स सामना खेळणार नाही. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने सांगितलं की, गुरुवारपासून ओव्हल येथे होणाऱ्या सामन्यात उपकर्णधार ऑली पोप संघाचे नेतृत्व करेल. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड 2-1 ने आघाडीवर आहे. इंग्लंडने चार बदल केले आहेत ज्यात गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन आणि जोश टोंग यांचा समावेश आहे. मँचेस्टरमध्ये चौथा कसोटी सामना खेळणाऱ्या संघातून स्टोक्स, जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन आणि ब्रायडन कार्स पाचवा कसोटी सामना खेळणार नाहीत.
बेन स्टोक्सने आतापर्यंत मालिकेत 17 विकेट्स घेतले आहेत, जे सर्व गोलंदाजांच्या यादीत सर्वाधिक आहेत. यासह एका शतकासह 304 धावांसह इंग्लंडचा पाचवा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. "कर्णधार बेन स्टोक्स उजव्या खांद्याच्या दुखापतीमुळे उपलब्ध नाही. फिरकी गोलंदाज लियाम डॉसन आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि ब्रायडन कार्स देखील खेळणार नाहीत. इंग्लंड संघात जेकब बेथेलचा समावेश करण्यात आला आहे, जो 6 व्या क्रमांकावर फलंदाजी करेल. गस अॅटकिन्सन आणि जेमी ओव्हरटन यांच्यासोबत नॉटिंगहॅमशायरचा जलदगती गोलंदाज जोश टंगू यांचाही समावेश आहे," असं ईसीबीने सांगितलं आहे.
Ben Stokes will miss out on the final Test of the series with a right shoulder injury
— England Cricket (@englandcricket) July 30, 2025
And we've made four changes to our side
मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना गुरुवारपासून सुरू होईल. भारताने मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे कडवी झुंज देत सामना अनिर्णित राखल्यानंतर इंग्लंड संघ 2-1 ने आघाडीवर आहे. 2007 नंतर भारताने कसोटी मालिका जिंकली नसून, अद्यापही ती संधी नाही. मात्र मालिकेचा निकाल अनिर्णित राखत त्यांना अभिमानाने मान उंचावण्याची संधी आहे.
फिरकी गोलंदाज लियाम डॉसन आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि ब्रायडन कार्स यांनाही या स्पर्धेतून वगळण्यात आले आहे. आतापर्यंत मालिकेत, आर्चरने दोन कसोटी सामन्यांमध्ये 28.66 च्या सरासरीने नऊ विकेट्स घेतल्या आहे. 55 धावांत 3 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. कार्सेने चारही कसोटी सामन्यांमध्ये 60 पेक्षा जास्त सरासरीने नऊ विकेट्स घेतल्या आहेत, तर सहा डावांमध्ये 164 धावांचे योगदान दिले आहे, ज्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. मँचेस्टरमध्ये आठ वर्षांनंतर डॉसनने कसोटीत पुनरागमन केले, परंतु तो फक्त एकच विकेट घेऊ शकला आणि फलंदाजीत 26 धावांचं योगदान दिले.
इंग्लंडने अष्टपैलू जेकब बेथेलचा समावेश केला आहे, जो सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. गस अॅटकिन्सन आणि जेमी ओव्हरटन यांना संघात स्थान देण्यात आलं आहे, तसंच नॉटिंगहॅमशायरचा जलदगती गोलंदाज जोश टँग देखील संघात आला आहे. टँगने शेवटचा बर्मिंगहॅम कसोटीत खेळला होता आणि आतापर्यंत त्याने 33.63 च्या सरासरीने 11 बळी घेतले आहेत, ज्याची सर्वोत्तम कामगिरी 33.63 आहे.