Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs ENG: मँचेस्टरमध्ये शुभमन गिलसोबत अपमानास्पद प्रकार, इंग्लिश प्रेक्षकांनी केले 'हे' वाईट कृत्य

IND vs ENG 4th Test: इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी बाद झाल्यानंतर भारतीय कर्णधार शुभमन गिलला इंग्लिश प्रेक्षकांकडून हुल्लडबाजीचा सामना करावा लागला.   

IND vs ENG: मँचेस्टरमध्ये शुभमन गिलसोबत अपमानास्पद प्रकार, इंग्लिश प्रेक्षकांनी केले 'हे' वाईट कृत्य

IND vs ENG 4th Test: भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय कर्णधार शुभमन गिलसोबत मँचेस्टरच्या मैदानावर अपमानास्पद प्रकार घडला. फॉर्मात नसलेल्या गिलला अवघ्या 12 धावा करून माघारी परतावे लागले आणि त्यानंतर इंग्लंडच्या प्रेक्षकांनी त्याला हूटिंग करत टार्गेट केलं.

इंग्लिश प्रेक्षकांचा गैरवर्तन

गिल जेव्हा पहिल्या डावात बाद होऊन पवेलियनकडे परतत होता तेव्हा ही घटना घडली. मँचेस्टरमधील इंग्लिश प्रेक्षकांकडून त्याच्यावर टिका आणि हूटिंग  करण्यात आली. काही दिवसांपूर्वी बर्मिंगहॅम कसोटीत गिलने 269 आणि 161 धावांची भक्कम खेळी करत 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार मिळवला होता. मात्र, लॉर्ड्स कसोटीत आणि आता मँचेस्टरमध्ये त्याचा फॉर्म घसरल्याचं पाहायला मिळालं. मागील तीन डावांमध्ये त्याने फक्त 16, 6 आणि 12 अशीच धावा केल्या आहेत.

हे ही वाचा: IND vs ENG: पंतमुळे भारताचं याच नाही शेवटच्या कसोटीचंही गणित गडबडलं? टीम इंडियाकडे आता फक्त 9...

 

 

 

पहिल्या दिवसाअखेर भारताची स्थिती

ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरू असलेल्या या कसोटीत भारताने पहिल्या दिवसअखेर 4 बाद 264 धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर प्रत्येकी 19 धावांवर नाबाद आहेत. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलने दमदार सुरुवात दिली आणि पहिल्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. राहुल 46 तर जयस्वाल 58 धावांवर बाद झाले.

हे ही वाचा: 'टी'ब्रेकमध्ये क्रिकेटर्स खरंच चहा पितात? स्टार क्रिकेटरने केला खुलासा

 

मोठी खेळी हुकली

करुण नायरच्या जागी संघात स्थान मिळवलेला साई सुदर्शन चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. त्याने संयमित फलंदाजी करत 61 धावांची खेळी केली, मात्र मोठी खेळी पूर्ण करता आली नाही. कर्णधार शुभमन गिल पुन्हा फ्लॉप ठरला आणि 12 धावांवरच बाद झाला.

हे ही वाचा: Video: 90 सेकंदांपर्यंत खेळ… शुभमन गिलचा इंग्लंडवर गंभीर आरोप, कर्णधाराने सांगितलं लॉर्ड्सवरच्या वादाचं कारण

 

पंतची दुखापत पुन्हा चर्चेत

ऋषभ पंतच्या दुखापतीवरून आधीच चर्चा सुरू होती. मात्र, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं. त्याने 48 चेंडूंमध्ये 37 धावा करत सकारात्मक फलंदाजी केली, पण नंतर पायाला दुखापत झाल्याने त्याला मैदानाबाहेर न्यावं लागलं.

Read More